पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर भाजपच्या महाराष्ट्रातील पुणे लोकसभेच्या संभाव्य यादीत माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचे नाव असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर मोहोळ यांच्या विरोधात पुणे महापालिकेच्या परिसरात, ‘स्टँडिंग दिली, महापौर पद दिलं.. सरचिटणीस बनवलं.. खासदारकी पण देणार?.. आता बास झालं.....
पुणे-मुंबई
#New Terminal of Pune Airport :पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन इतके दिवस का होऊ दिले नाही?- मोहन जोशी
News24Pune -
New Terminal of Pune Airport- पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन अखेरीस १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत हे ऐकल्यावर मनात येते की, ऑनलाईन पद्धतीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्घाटन करायचे होते तर ते आधीच का केले नाही? प्रवाशांची या नव्या टर्मिनलमुळे फार मोठी सोय होणार होती हे माहीत असूनही विमान प्रवास करणाऱ्या पुणेकरांची...
पुणे- देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. रात्री त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महायुतीच्या नेत्यांशी सह्याद्रीवर चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, अमित शाह यांचा जागावाटप संदर्भातील मुंबईतील चर्चेचा फेरा संपल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते आज( बुधवार दि. ६ मार्च) रवाना...
Leopards Ran Away : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून काल पसार झाला. १३० एकरांवर वसलेल्या प्राणी संग्रहालयात हा नर जातीचा बिबट्या पसार झाला. त्याला पकडण्यासाठी गेल्या २४ तासांपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याच्या आजूबाजूला तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. (Leopards at the Rajiv Gandhi Zoological Museum, Katraj ran...
पुणे-मुंबई
‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’: मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ मित्रांतर्फे बैठकीचे आयोजन
News24Pune -
Muralidhar Mohol, Pune Loksabha: भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पुणे शहरातून भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगदीश मुळीक, संजय काकडे, शिवाजी मानकर, सुनिल देवधर अशी मोठमोठी नावे चर्चेत असून त्यांपैकी माजी महापौर मुरलीधर मोहोळ उर्फ अण्णा यांचे नाव स्पर्धेत अग्रस्थानी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि दांडगा जनसंपर्क...
Sumitra Mahajan - सेवेतून संपर्क, संपर्कातून संस्कार आणि संस्कारातून संघटन बनते. असे संघटनच भारताला बलशाली बनवेल, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी रविवारी केले. समाज घडविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभर अविरत मेहनत घेत आहे, असेही त्या म्हणाल्या.'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती'च्या वतीने पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन येथे...














