बेकायदेशीररित्या किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल


पुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट, रुग्णालयाच्या नामांकित डॉक्टरांसह एकूण 15 जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या एका महिलेने याबाबत तक्रार दिली होती. 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची एक किडनी रुग्णास देण्यात आली. परंतु ठरलेले पैसे तिला देण्यात न आल्याने तिने आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे (रा, मोशी, पुणे), अण्णासाहेब साळुंखे (रा. जावळा, ता. सांगोला, सोलापूर), सारिका गंगाराम सुतार (रा. कोल्हापूर), शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजीत मदने, रुबी हॉलचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रांट नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय सदे, युरोलॉजिस्ट डॉ. हिमेश गांधी, युरोलॉजिस्ट डॉ. भूपात भाटी, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी, रुबी हॉस्पीटलच्या उपसंचालक रेबेका जॉन यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळ पुण्याचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम (वय 59, रा. शनिवार पेठ, पुणे, मु. रा. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

अधिक वाचा  संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे २१ जूनला पंढरीकडे प्रस्थान

कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेस पैशांची गरज असल्याने तिने अमित साळुंखे यांना दलालामार्फत संपर्क करत एक किडनी देण्याचे कबूल केले होते. याकामाकरिता तिला अमित साळुंखे व सुजाता साळुंखे यांनी 15 लाख रुपये देण्याचे ठरले होते. या महिलेने रुग्णालयात रुग्णाची पत्नी असल्याचे नाते सांगून अवयव प्रत्यारोपणास संमती दर्शवली. त्याप्रमाणे सारिका सुतार हिचे किडनी ट्रान्सफर ऑपरेशन 24/3/2022 रोजी पुण्यातील नामांकित रुबी हॉल क्लिनिक याठिकाणी पार पडले. परंतु, साळुंखे दांम्पत्याने किडनी ट्रान्सफर झाल्यानंतर केवळ चार लाख रुपये देऊन तिची फसवणूक केली. त्यामुळे संबंधित महिलेने याप्रकरणाची वाच्यता करत पोलीस तक्रार दाखल केली.

आर्थिक व्यवहार बिघडल्याने प्रकरण उघडकीस

महिलेने तिचे बेकायदेशीर प्रकारे किडनी प्रत्यारोपण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रुग्णालयानेही प्रत्यारोपण करताना संबंधित महिलेने वेगळय़ा नावाची कागदपत्रे रुग्णालयात जमा केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती व अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केला होता. त्यानंतर चार तज्ञांच्या चौकशी समितीने याबाबत तपास करीत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love