होळी आणि धुळवड साजरे करण्यास बंदी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासन आणि महापालिकेकडून निर्बंधामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज याचे आदेश जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.

या आदेशानुसार  कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, मैदाने ,शाळा, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे २८ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

 कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता, नागरिकांनी पालन करावयाचे आवश्यक ती मानद कार्यप्रणालीनुसार पुणे जिल्हयाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर मनाई आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे तसेच सदर आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा- 2005 व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *