Happy New Year from Ajit Pawar: सर्वांच्या सहभाग, सहकार्य, प्रयत्नांतून शक्तीशाली, प्रगतशील महाराष्ट्र घडवूया- अजित पवार यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा

Happy New Year from Ajit Pawar
Happy New Year from Ajit Pawar

Ajit Pawar’s New Year Wishes : “महाराष्ट्र देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ असून नव्या 2024 वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया… शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणुक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखूया… छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrpati Shivaji Maharaj)  आदर्शांवर, राजर्षी शाहू महाराज(Shahu Maharaj), महात्मा फुले(Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या महामानवांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल कायम ठेवूया… जाती (Caste), धर्म(Religion), भाषा(Language), पंथ(Creed), प्रांत(Region), लिंगभेदाच्या(Gender) भिंती तोडून टाकूया… अज्ञान (Ignorance) , अनीती(injustice), अंधश्रद्धा(superstition), अनिष्ठ रुढी-प्रथा-परंपरा (bad customs and traditions) नष्ट करुया… सत्यशोधक(Truth seeker), पुरोगामी(progressive), विज्ञानवादी (scientist) विचारांचा अंगिकार करुया… आपल्या सर्वांच्या सहभाग, सहकार्य, प्रयत्नांतून मजबूत, प्रगत महाराष्ट्र( Advanced Maharashtra) घडवूया..,”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)  यांनी राज्यातील जनतेला नवीन 2024 वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy New Year from Ajit Pawar)

अधिक वाचा  भाजपचे बायकी राजकारण :‘भोंगे व हनूमान चालीसाचेच’ राजकारण करायचे होते तर भाजपने स्वतः पुढे येऊन सुरवातीलाच का केले नाही..? -- गोपाळदादा तिवारी

(Let’s build a strong, progressive Maharashtra through everyone’s participation, cooperation and efforts)

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)  आपल्या शुभेच्छा संदेशात (Greetings message) म्हणतात की, मावळत्या 2023 वर्षाला निरोप देवून नव्या 2024 वर्षाचं स्वागत करत असताना सिंहावलोकन करण्याची गरज आहे. मागील वर्षात अपूर्ण राहिलेले संकल्प नव्या वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया. 2023 वर्ष राज्यासाठी आव्हानांसोबत यशाचं वर्ष होतं. शेतकरी बांधवांच्या कष्टांमुळे कृषीप्रगती, कामगारांच्या श्रमांमुळे औद्योगिक प्रगती अखंड सुरु राहिली. कला(Art), क्रीडा(Sports), साहित्य(Literature), संस्कृती(Cuture), आरोग्य(Health), शिक्षण(Education) अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रानं (Maharashtra)उल्लेखनीय यश मिळवलं. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल राहिला. राज्याची सामाजिक वीण अधिक घट्ट झाली.  हे सर्व संचित घेऊन आपण नवीन वर्षात प्रवेश करत आहोत. नवीन 2024 वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातल्या इच्छा-आशा-आकांक्षा पूर्ण होवोत. सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध होवो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

अधिक वाचा  पुण्यात प्रथमच गोयंका ग्लोबल एज्युकेशनने सुरू केले फिनलँड इंटरनॅशनल स्कूल

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love