पुणे- आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ, 30 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष, पँथर आणि इतर सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे हनुमंत साठे यांचे वयाच्या 56 व्या वर्षी आज आजारपणाने निधन झाले.
रिपब्लिकन पार्टीमध्ये ते गेले 30 वर्षापासून कार्य करीत होते. दलीत समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे .लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले. दलीत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी कायम लढा दिला .
त्यांच्या मागे मुलगा विरेन,पत्नी सत्यभामा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे .दलीत चळवळीतील अतिशय संवेदशील असे व्यक्तिमत्व हरपले आहे .
बुधवारी दुपारी 3 वाजता धनकवडी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
















