डॉ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी


पुणे– पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी हाफकीन जीव औषध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Dr. Rajesh Deshmukh is the new Collector of Pune अगोदरचे  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्या जागेवर डॉ. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.                

 डॉ. देशमुख यांच्या जागेवर डॉ. कुणाल खेमणार ( भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.    डॉ. देशमुख हे २००८ च्या बॅचचे आहेत. एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला त्यांनी प्रारंभ केला होता. तत्कालीन राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते आणि सध्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे डॉ. देशमुख स्वीय सहायक  होते.  सातारा जिल्हा परिषेदेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते.  त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेचा आलेख उंचावत गेला. त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली असल्याचे बोलले आहे.

अधिक वाचा  शिक्षण धोरणात सातत्याने विचार व्हावा

स्वच्छ भारत अभियान,  पंतप्रधान आवास योजना यांसारख्या त्यांच्या कामांची देशपातळीवर दखल घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी विविध योजना राबविल्या त्यामुळे २०१८ मध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा १२९  ने कमी झाला होता. 

 पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून चौथे देशमुख

पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख हे चौथे देशमुख आहेत. या अगोदर शिवाजीराव देशमुख, प्रभाकर देशमुख, विकास देशमुख यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी पद भूषविले आहे. हाफकीनचे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या एकूण कामाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love