नेदरलँड येथील देन हाग शहरात हिंदू स्वयंसेवक संघ नेदरलँड प्रणित बाल गोकुलम परिवार शाखेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा


अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।

चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः!!

भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अनन्साधारण मानले गेले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय गुरुपौर्णिमेचा सण साजरा करतात. (Gurupurnima celebration by Hindu Swayamsevak Sangh Netherlands Praneet Bal Gokulam Parivar branch)

वेद, उपनिषद आणि पुराणांचे लेखक महर्षि वेद व्यास जी, 3000 ईसापूर्व या दिवशी जन्मले, त्यांना सर्व मानवजातीचे गुरु मानले जाते आणि त्यांचा जन्मदिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे प्रथमच प्रवचन दिले होते, असेही मानले जाते. याशिवाय योग परंपरेनुसार या दिवशी भगवान शिवाने सप्तऋषींना योगाचे ज्ञान दिले आणि ते पहिले गुरु झाले.

अधिक वाचा  युएईच्या आरोग्यमंत्र्यांनी केले ते भारताचे आरोग्यमंत्री करणार का?

स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच ईश्वरप्राप्तीची इच्छा होती. गुरु परमहंसांचा आशीर्वाद मिळाल्यावरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली. गुरूंच्या कृपेनेच आत्मसाक्षात्कार शक्य झाला.

गुरूंचे महत्त्व कबीर दासजींच्या दोह्यांमध्ये सर्वात जास्त दिसून येते. आचार्य चाणक्य हे एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या विद्वत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय इतिहासाची दिशा बदलून टाकली. गुरु चाणक्य हे कुशल राजकारणी आणि उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आपला वीर शिष्य चंद्रगुप्त मौर्य याला राज्यकर्ते बनवून त्यांनी दाखवलेल्या विलक्षण प्रतिभेची अवघ्या जगाला ओळख आहे.

याच पार्श्वभूमीवर,  नेदरलँड येथील देन हाग शहरात हिंदू स्वयंसेवक संघ नेदरलँड प्रणित बाल गोकुलम परिवार शाखेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बालगोकुलम देन हाग,  गेली अनेक वर्ष दर रविवारी स्वयंसेवकांच्या मदतीने शाखेचे निशुल्क आयोजन करीत आहे.  नेदरलँड मध्ये वास्तव्यास असलेल्या  भारतीय कुटुंबीयांच्या पुढच्या पिढीपर्यंत आपले सण,परंपरा आणि संस्कृती यांची जपणूक, ओळख आणि हस्तांतरण या प्रमुख उद्देशाने  शाखा कार्यान्वित केली जाते.

अधिक वाचा  पुणे फेस्टिवल २०२३ अंतर्गत 'अखिल भारतीय मुशायरा'

भगवा ध्वज गुरु स्वरूप मानून वंदन

गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात भगवा ध्वज गुरु स्वरूप मानून वंदन करून तसेच भारत माता ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि राष्ट्र ऋषी माधव गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

त्यानंतर सामूहिक खेळ, समूह गीत, अमृत वचन, श्लोक इत्यादी नंतर कार्यक्रमाची सांगता सामूहिक ध्वजवंदना आणि ऐच्छिक गुरुदक्षिणेने करण्यात आली. विशेष म्हणजे गुरुदक्षिणेद्वारे येणाऱ्या दक्षिणेचा वापर आणि नियोजन हे देखील अतिशय पारदर्शक पद्धतीने मांडण्यात आले.

सोहळ्याचा समारोप सहभागी जनतेन प्रसाद स्वरूपात आणलेल्या अल्पोपहारने केला गेला. या आणि अशाच इतर अनेक सुंदर उपक्रमाबद्दल संपूर्ण बाल गोकुलम देन हाग टीमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

अधिक वाचा  इंटरनेट सर्चमध्ये ट्रम्प, बिडेन यांच्यापेक्षा आघाडीवर?

सुखदा गंगेले पारखी

द नेदरलँड

#guru pornimaa | Nedarland |den hag | Hindu Swayansevak sangh |Bal Gokulam Parivar branch

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love