औरंगाबाद(ऑनलाईन टीम)—राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या सदस्यांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांना मतदार संघाच्या विविध भागातील आणि विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या पदवीधर तरुणांचा वाढता पाठींबा बघता प्रा. ढवळे यांचे पारडे जड झाल्याचे जाणवत आहे. प्रा. ढवळे यांची त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्यामुळे लोकप्रियता वाढली आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचा त्यांना पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे.
प्रा. ढवळे यांनी केवळ औरंगाबाद पदवीधर मतदार संघात नव्हे तर संपूर्ण राज्यात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, अनाथ, अपंग, खेळाडू व वंचित घटकातील प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न केले असल्याचे विद्यार्थी सांगतात. त्यातून त्यांची विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता वाढत गेली. प्रा. ढवळे यांनी विद्यार्थी हितासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवून तसेच अनाथ, अपंग, निराधार यांच्यासाठी विविध योजना स्वःताच्या पुढाकारातून राबविल्या आहेत. या सर्व गोष्टींमधून त्यांनी पदवीधर आणि समाजाप्रती असलेली तळमळ दाखवून दिली आहे. तसेच, जागतिक महामारी कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय, तसेच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी मोफत बस व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. प्रा. ढवळे यांनी पदवीधरांच्या अनेक प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम केले आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापोर्टलचा विषय असो वा कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांचा प्रश्न, प्राध्यापक भरती, तासिका वेतन (सीएचबी) निश्चिती, संगणक शिक्षकांचे प्रश्न यांसारख्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी लढा देऊन सरकारला धारेवर धरले आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचाही प्रयत्न केला.
प्रा. सचिन ढवळे सर यांच्या उमेदवारीस महाराष्ट्रातील एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे तसेच डी.टी. एड, बी. एड. स्टुडंस असोसिएशन यांसारख्या राज्यव्यापी संघटना , सामाजिक, शैक्षणिक विभागात कार्यरत असणाऱ्या विविध राजकीय, शिक्षक संघटना आणि खासगी कोचिंग क्लास असोसिएशन आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने आणि प्रा. ढवळे यांनी ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे.
प्रा. ढवळे यांनी विद्यार्थी हितासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवून तसेच अनाथ, अपंग, निराधार यांच्यासाठी मोफत क्लास ची सुविधा करून दिली आहे. एमपीएससी करणाऱ्या काही मुलांचे ऑपरेशन स्वखर्चातून केले आहे, म्हणूनच सचिन ढवळे सर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून आमदार व्हावे असे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटते अशा भावना एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी अर्जुन पळसे, अजित गद्रे, सचिन शेटे,ओंकार गोफणे,गणेश कोकरे यांनी व्यक्त केल्या.