सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारीला : १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पदवी प्रमाणपत्र

Graduation ceremony of Savitribai Phule Pune University
The test paper for the fellowship offered through Barti, Sarathi, Mahajyoti organizations has cracked?

Savitribai Phule Pune University: 123rd Graduation Ceremony- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारी रोजी होणार आहे. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती ( Governor and Chancellor of the University ) रमेश बैस ( Ramesh Bais ) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष (President of the International Cultural Council)  डॉ. विनय सहस्त्रबुद्धे ( Dr. Vinay Sahastrabuddha ) उपस्थित राहणार आहेत. (Graduation ceremony of Savitribai Phule Pune University)

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (Vice Chancellor of Savitribai Phule Pune University) प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi ) , प्र-कुलगुरू(Pro-Vice-Chancellor प्रा.(डॉ.) पराग काळकर ( Prof. Dr. Parag Kalkar ) आणि प्रभारी कुलसचिव ( Registrar-in-charge ) प्रा. (डॉ.) विजय खरे ( Prof. (Dr.) Vijay Khare )यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.

अधिक वाचा  प्रश्नसंचातील प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचा प्रकार उघडकीस

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यावर्षी आपले अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे यावर्षीचा पदवी प्रदान सोहळा खास ठरणार आहे. विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात ८५ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र,  १९ हजार ७६८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, २२६ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, १८७ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ४ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या कार्यक्रमात 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे वितरण करण्यात येणार असून 2 विद्यार्थ्यांना पी.सी अॅलेक्झांडर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात काही निवडक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना पोस्टाने तर काहींना त्यांच्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love