Bappa was welcomed by Muslim brothers

मुस्लिम बांधवांनी केले बाप्पाचे स्वागत

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- पुण्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीचे स्वागत आणि सन्मान पुण्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला.

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे ( Pune Police Vighnaharta Trust) विश्वस्त डॉ. मिलिंद भोई (Dr. Milind Bhoi) यांच्या पुढाकाराने गेले 16 वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते . मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट, पुणे (Muslim Auqaf Welfare Trust) यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक पटेल (Mushtak Patel), एडवोकेट मारूफ पटेल(Maruf Patel), युसुफ बागवान(Yusuf Bagvan) ,हाजी इकबाल तांबोळी(Haji Ikbal Tamboli) , रशिद शेख(Rashid Shaikh), बाबर शेख (Babar Shaikh), ईकबाल दरबार(Iqbal Darbar), सय्यद अली(Sayyad Ali), शबाना देशपांडे सालेम जिया खान आधी बांधवांनी मानाच्या बाप्पांचे शाल व श्रीफळ देऊन तसेच अत्तर लावून स्वागत करण्यात आले. मानाचा पहिला श्री कसबा गणपती (Kasaba Ganpati) व दुसरा तांबडी जोगेश्वरी (Tambadi Jogeshwari) या बाप्पाच्या पालखीला या बांधवांनी आपल्या खांद्यावर घेऊन काही अंतर निरोप दिला.

सामाजिक सलोखा व सद्भावच्या दृष्टीने गेली सोळा वर्षे हा उपक्रम पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास चे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांच्या पुढाकाराने आम्ही घेत आहोत आणि याच्यातून एक बंधू भावाचा संदेश सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे प्रतिपादन  मुस्लिम औकाफ वेलफेअर चे अध्यक्ष मुस्ताक पटेल यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच मिरवणूक संपल्यावर दुसऱ्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना आणि स्वयंसेवकांना मुस्लिम बांधवांच्या वतीने  श्रमपरिहारासाठी शिरखुर्मा  देण्यात आला

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *