महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार हे जिंकून येण्याच्या निकषावरच ठरतील – जयंत पाटील

The party is not owned by anyone
The party is not owned by anyone

Jayant  Patil | Mahavikas Aghadi : महायुतीचे (Grand Allianc)  घटक पक्ष (constituent parties) हे नव्याने एकत्र आले असून त्यांना ओळखी वाढवायच्या आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर जिल्हानिहाय मेळावे घेण्याची वेळ आली असावी, अशी टिपण्णी राष्ट्रवादीचे(NCP) (शरद पवार गट) (Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)  लोकसभेचे उमेदवार (Loksabha Candidate)  हे जिंकून येण्याच्या निकषावरच ठरतील, असेही त्यांनी नमूद केले. (Lok Sabha candidates of Mahavikas Aghadi will be decided only on the basis of winning)

पुण्यात पक्षाच्या कार्यालयात शिरुर लोकसभा मतदारसंघाची(Shirur Loksabha)  बैठक पार पडल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) (Jagannath Shewale)  आदी पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांच्या अपात्रतेबद्दल(Disqualification Of MLA’s) दिलेल्या निर्णयावर मत व्यक्त करताना पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) प्रतोद सुनील प्रभू हे असल्याचे नमूद केले होते. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांना प्रतोद गृहीत धरुन निकाल दिला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वौच्च न्यायालयात (Supream Court) दाद मागितली जाणार आहे, शिवसेना ही खरी कोणाची आहे. हे जनतेला ठाऊक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)  यांनी निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी नार्वेकर यांची भेट घेतली. वास्तविक शिंदे यांनी ही भेट घ्यायला नको होती. त्यांनी भेट घेतल्याने जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे. 

अधिक वाचा  बापट - काकडेंची होळी : आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील?

 निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीच्या घटक पक्षांचे आता जिल्हानिहाय मेळावे होत आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, महाविकास आघाडी ही 2019 पासून एकत्र आहे. महायुतीमधील घटक पक्ष नव्याने एकत्र आले आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर ओळखी वाढवायच्या असतील. महाविकास आघाडीत नव्याने भेट घेण्याची गरज नाही. महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्ली येथे बैठक झाली आहे. ही चर्चा योग्य पद्धतीने सुरु असून, जागा वाटप करताना निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेली नाही, परंतु त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आहे की नाही याची विचारणा जरूर करू, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love