यंदाचा गोवा लघुपट महोत्सव पुण्यामध्ये होणार


पुणे : दरवर्षी गोव्यामध्ये होणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुण्यामध्ये १२ आणि १३ डिसेंबर रोजी होणार आहे. महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती संयोजक मराठी चित्रपट परिवारचे अनुप जोशी यांनी दिली.
ते म्हणाले, “गेल्या सहा वर्षांपासून महोत्सव गोव्यातील पणजी येथे होतो. मात्र, कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गोव्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने असल्याने यंदा हा महोत्सव पुण्यात होत आहे. महोत्सवासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत महोत्सवात भारतासह देश विदेशातील शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात येणार आहे. रविवारी (दि.१३) रात्री ८ वाजता ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे, ज्येष्ठ कॅमेरामन राम झोंड यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण होणार आहे. विविध विभागातील १८ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  नाशिकचा बुलेट राजा पुण्यात गजाआड:पाच वर्षांचे कारनामे उघड