गिरीश बापट आणि संजय काकडे प्रचारात सक्रिय : देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश : नाकात ऑक्सीजनची नळी आणि थरथरते हात अशा अवस्थेत बापटांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)— पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे २०२४ च्या निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे. भाजपमधील पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजपची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढली असतानाच त्यांच्या शिष्टाईला यश मिळाल्याचे दिसत आहे. राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे प्रचारापासून दूर होते तर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी आपण प्रकृतीचे कारण देत हेमंत रासने यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असे पत्र पाठवून कळवले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जवळपास सात तास बैठक घेऊन नाराजी दूर केल्याची माहिती आहे. गुरुवारी संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट हे दोघेही प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसते आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी आपण प्रकृतीचे कारण देत हेमंत रासने यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असे पत्र पाठवून कळवले. मात्र, दुसरीकडे बापट यांनी आपली सून स्वरदा बापट यांच्यासाठी कसबा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी तिकिट मागितले होते. परंतु, पक्षाने बापट आणि टिळक या दोन्ही कुटुंबांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे टिळक कुटुंबांबरोबरच बापट देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्हीही पोटनिवडणुकीत भाजपला फटका बसला आणि ही पोटनिवणूक हारली तर येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उतरती कळा लागू शकते, अशी शक्यता राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कसबा पोटनिवडणुकीसाठी स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांचे पती शैलेश टिळक यांनी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे गिरीश बापट हे देखील आपली सून स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. तर गटनेता गणेश बिडकर, संघांचे स्वयंसेवक धीरज घाटे हे देखील उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. मात्र, प्रत्यक्षात पक्षाने टिळक-बापट कुटुंबाला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे टिळक-बापट कुटुंबाला उमेदवारी न मिळाल्याने एकीकडे ब्राह्मण समाज तर धीरज घाटे यांनाही उमेदवारी न मिळाल्याने संघ स्वयंसेवक देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता संजय काकडे यांना महत्व न दिल्याने तेही या निवडणुकीपासून लांब असल्याचे चित्र आहे. भाजपला या अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्हीही पोटनिवडणुकीत भाजपला फटका बसला आणि ही पोटनिवणूक हारली तर येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उतरती कळा लागू शकते, अशी शक्यता राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक अधिक गांभीर्याने घेतली आहे.

संजय काकडे आणि गिरीश बापट सक्रिय

दरम्यान, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट हे दोघेही कसबा पोट निवडणुकीसाठी उभे असलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या  शिष्टाईला यश मिळाल्याचे दिसते आहे.

संजय काकडे हे आज प्रसार माध्यमांसमोर आले. त्यांना काल झालेल्या बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले की कालच्या बैठकीत कोणाचीही कान उघडणी करण्यात आलेली नाही. कसबा पोटनिवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी काल बैठक घेण्यात आली होती. तिन्ही पक्षांची आघाडी झाल्याने कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती ठरवायची यासाठी काल बैठक घेण्यात आली होती. मी नाराज नसून माझ्या व्यवसायाची काही कामे सुरू होती. त्यामुळे मी व्यस्त होतो. पण काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की २६ तारखेपर्यंत तुमचे व्यवसाय बाजूला ठेवा. त्यामुळे येता सव्वीस तारखेपर्यंत मी कसबा पोट निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार आहे.

येणाऱ्या महानगरपालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कुठल्याही पद्धतीचे jरिस्क नको म्हणून आम्ही लक्ष घातले आहे. आम्ही ही निवडणूक नक्कीच जिंकू. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य शासनाने राबवलेल्या योजना कसबा मतदार संघातील नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत, असे देखील यावेळी काकडे म्हणाले. खासदार गिरीश बापट यांच्या बाबतीत प्रश्न विचारला असता काकडे म्हणाले की खासदार गिरीश बापट यांची तब्येत बरी नाही. त्यांना सध्या ऑक्सिजनची गरज आहे. अश्या पद्धतीने जर ते प्रचाराला आले तर तुम्हीच नाव ठेवणार तसेच पक्षाची देखील इज्जत जाणार. अशा परिस्थितीमध्ये मी प्रचाराला आलो आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरचे सर्वजण प्रचारात सहभागी होणार असल्याचे देखील काकडे यांनी यावेळी सांगितले आहे.

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब आहे. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्र काढत  कसबा पोटनिवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. यावरुन गिरीश बापट हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा होत. गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. बापट नाराज असल्याच्या चर्चेचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे आता थेट गिरीश बापट स्वत: या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहे.

गिरीश बापट यांनी गुरुवारी केसरीवाडा, नारायण पेठ येथे कार्यकर्त्यांचा मेळाव्याला संबोधित केले. आजारी असल्याने बापट यांनी पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘खूप काम करा, कसब्यात विजय नक्की आहे’ असा संदेश दिला आहे.

मेळाव्यास भाजप उमेदवार हेमंत रासने, निवडणूक प्रचार प्रमुख, आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार प्रदीप रावत, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे. संघटन सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट यांनी प्रकृती ठीक नसताना प्रचाराला हजेरी लावली. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असल्याने गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते.

बापट म्हणाले, “भाजपने लढविलेल्या अनेक निवडणुकात पक्षाची हार-जीत झाली आहे. मात्र भाजपचे पक्ष संघटन कायम राहिले. या पक्ष संघटनेमुळे कसब्यातील ही निवडणूक चुरशची नाही. ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत”, असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला.

“कार्यकर्त्यांनी चांगलं काम करावे. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेले अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धान्य मानले आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे.”

यानंतर त्यांनी हेमंत रासने  यांच्या कामचे कौतूक केले. बापट म्हणाले, “हेमंतचे काम चांगले आहे. ते नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा, ही निडणूक आपणच जिंकणार आहोत. मी बरा होऊन परत येईल. विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल,”असेही बापट म्हणाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *