मुंबई-महाराष्ट्रामध्ये जिओच नाणं पुन्हा एकदा खणखणीत असल्याचे ट्राय च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. जून 2020 या नुकत्याच संपलेल्या पहिल्या तिमाहिमध्ये ग्रॉस रेवेंन्यू मध्ये जिओ ने बाजी मारली असून अव्वल स्थानी असलेल्या व्होडाफोन आयडिया या दिग्गज आणि जुन्या टेलिकॉम ऑपरेटर चे वर्चस्व मोडीत काढून तब्बल रु.1521कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या आयडीया व्होडाफोन चा ग्रॉस रेवेंन्यू रु. 1415 कोटी इतका आहे. एअरटेल तीसऱ्या स्थानी असून त्यांचा या तिमाहीत रु. 895 कोटी रेवेन्यू आहे.
टक्केवारी विचारात घेतल्यास जिओ चा ग्रॉस रेवेंन्यू 38.78% वर पोहोचला आहे तर आयडिया व्होडाफोन चा 36.09% आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या एअरटेल चा 22.82% आहे.
ए.जी. आर. (ऍडजस्टेड ग्रॉस रेवेंन्यू)ची आकडेवारी पाहता महाराष्ट्र सर्कल ने जोरदार कामगिरी नोंदविली असून आपले एकहाती वर्चस्व स्थापित केले आहे. तब्बल 46.28% एवढा वाटा एकट्या जिओ चा असून आयडिया व्होडाफोन चा एकत्रित 29.65% इतका आहे. एअरटेल 20.96% सह तिसऱ्या स्थानी आहे. रु. 1321 कोटी ए. जी. आर सह जिओ अव्वल स्थानी असून व्होडाफोन आयडिया रु. 840 कोटी,एअरटेल रु. 594 कोटीसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे.
पदार्पणापासूनच जिओ ने आपल्या 100% फोर जी नेटवर्क आणि अतिशय स्वस्त डेटा मुळे ग्राहकांची मने जिंकली आहेत. विस्तृत नेटवर्क कव्हरेज, फक्त डेटा साठी पैसे आकारून आयुष्यभरासाठी मोफत व्हॉइस कौलिंग हे घटक जिओला सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स मध्ये अव्वल बनविण्यास कारणीभूत ठरले. जिओ फोनमुळे अतिशय परवडणाऱ्या दरात ग्राहकांना डिजिटल क्रांती पर्यंत पोहोचण्यास मदत झाली. केवळ 4 वर्षात जिओचे महाराष्ट्रात 3.30 कोटी ग्राहक असून 3 कोटींचा टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.