गुंड शरद मोहोळचा त्याच्या साथीदारांनी असा केला खात्मा : पहा व्हिडिओ

Gangster Sharad Mohol was killed by his accomplices
Gangster Sharad Mohol was killed by his accomplices

Gangster Sharad Mohol murder — कुख्यात गुंड(Gangstar) शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना शुक्रवारी रात्री अटक केली.  यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. रवींद्र पवार(Ravindra Pawar) आणि संजय उड्डाण (Sanjay Uddan) अशी पोलिसांनी अटक केलेल्या वकिलांची नावे आहेत. हे दोघेही शिवाजीनगर कोर्टात वकिली करतात, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त( Additional Commissioner of Police ) रामनाथ पोकळे (Ramnath Pokale)  यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Magistrate) अमृत बिराजदार(Amrut Birajdar) यांनी सहा आरोपींना दहा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर, दोन आरोपी वकिलांना आठ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.(Gangster Sharad Mohol was killed by his accomplices)

साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, ता. मुळशी), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, ता. मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड), ॲड. रवींद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदेगाव, ता. मुळशी), ॲड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी कॉलनी, कोथरुड) यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात आयपीसी 302, 307, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपींना शनिवारी न्यायलायात हजर करण्यात आले. यातील सहा आरोपींना दहा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर, दोन आरोपी वकिलांना आठ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

अधिक वाचा  पकडले दुचाकी चोर म्हणून, निघाले एनआयएच्या रडारवरील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी

शरद मोहोळ खून प्रकरणात  आठ जणांना रात्री पुणे सातारा रस्त्यावरील शिरवळ परिसरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल, तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे, ८ मोबाईल, महिंद्रा एक्सयुव्ही, स्वीफ्ट गाडी, रोख रक्कम असा एकूण २२ लाख ३९ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शरद मोहोळ याच्यासोबत असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे.

कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्या हत्येनंतर आरोपी पळून गेले होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार,  सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेची ९ पथके तयार करुन आरोपींच्या शोधासाठी पुणे शहर परिसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व कोल्हापुरच्या दिशेने रवाना केली होती.

दरम्यान, खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुन्हा केल्यानंतर चारचाकी गाडीतून पळून गेल्याचे समजले. पथकाने सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपी मुंबई-बेंगलोर महामार्गानेसातारा रोडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींच्या चारचाकी गाडीचा नंबरचा मिळवला. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी खेड शिवापुर टोलनाका पास करुन पुढे जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी खंडणी विरोधी पथक एक व गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकांना आरोपींच्या शोधासाठी साताऱ्याच्या दिशेने रवाना केले. तसेच सातारा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून सातारा मार्गावर व शिरवळ, आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परिसरात नाकाबंदी केली. आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ संशयित स्वीफ्ट गाडी (एमएच-१२ व्ही.क्यु 9500) गाडीचा ५ किमी पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकांनी गुन्हा घडल्यानंतर आठ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अधिक वाचा  पुण्यात रंगणार दृष्टीहिनांसाठीची राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा

सहा आरोपींना चार दिवसांची तर दोन वकिलांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सहा आरोपींना दहा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर, दोन आरोपी वकिलांना आठ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सरकारी पक्षाचे वतीने ॲड. नीलिमा इथापे यादव यांनी युक्तिवाद केला.तर, आरोपी रवींद्र पवार आणि संजय उढाण यांच्यावतीने जेष्ठ वकील हर्षद निंबाळकर, ॲड. एन. डी. पाटील, ॲड.एस एम शाह, ॲड.विश्वजित पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली तर इतर सहा आरोपींच्या वतीने ॲड. ए बी कदम, ॲड.एस व्हीं देवकर यांनी युक्तिवाद केला.

तपास अधिकारी वपोनि हेमंत पाटील म्हणाले, शरद मोहोळ याचा खून आरोपींनी केल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे. घटनास्थळी चार आरोपी होते आणि त्यातील तिघांनी गोळीबार केला. हा गुन्हा गंभीर, संवेदनशील असून त्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपी साहिल, नामदेव आणि विठ्ठल यांचे यापूर्वी गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. आरोपींना पळून जाण्यास कोणी मदत केली, त्यांचा गुन्ह्याचा उद्देश काय होता, आर्थिक रसद कोणी पुरवली , शस्त्र कोणी दिली याबाबत सखोल तपास करण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.

अधिक वाचा  'राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक'अभियान सर्वसामान्यांसाठी समर्पित

ॲड. निंबाळकर म्हणाले, गुन्ह्यातील  दोन वकील हे बार असोसिएशन वकील असून ते शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतात. साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे हे यापूर्वीचे गुन्ह्यात त्यांचे पक्षकार आहे. इतर आरोपी यांनी त्यांना फोन करून पोलिसांना शरण जाणार असून तुमचा सल्ला भेटून द्या असे सांगितले. त्यानुसार वकिलांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सल्ला देत असताना, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वकिलांनी आरोपी पळून जाण्यास मदत केलेली नाही. त्यांची केस वेगळी चालविण्यात यावी. कोथरूड पोलीस ठाण्याचे कदम नावाचे एक जुने पोलीस उपनिरीक्षक यांना आरोपी शरण करण्याबाबत माहिती देण्यात आली होती. कोणताही वकिलास पक्षकरास सल्ला देण्याचा अधिकार आहे. कलम १२६ आणि १२९ नुसार ही बाब गोपनीय राहील याचा अधिकार आहे.

मोहोळच्या अंत्ययात्रेत त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी

गुंड शरद मोहोळच्या अंत्ययात्रेत त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पुण्याच्या रस्त्यावर समर्थक तरुणांनी आपल्या दुचाकींनी जणू रॅलीच काढली होती. या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहोळ अंत्ययात्रेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कारण, शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात गँगवॉर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love