सुनेची आत्महत्या : आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पती आणि मुलाला अटक


पुणे(प्रतिनिधि)–आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती व मुलाला सुनेच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक उमरगेकर (६०) व पुत्र अभिषेक उमरगेकर (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रियांका यांचे वडील अनिल घोलप (45) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आळंदी नगरपरिषदेच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने दोन दिवसांपूर्वी घरगुती कारणाहून आत्महत्या केली होती. आता या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून प्रियांका उमरगेकर यांचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घोलप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रियांका यांचे आठ महिन्यांपूर्वी अभिषेक उमरगेकर यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या मुलीचा राहिलेला हुंडा म्हणजेच संसारोपयोगी साहित्य व फर्निचर कधी आणणार याबाबत तिचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केली.

अधिक वाचा  भारतीय मजदूर संघाची ६ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर 'मजदूर चेतना यात्रा'

या प्रकरणी आळंदी पोलिसांनी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे , त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या प्रियांका घोलप या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची ती कन्या होती.

याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियांका आणि अभिषेक यांचा ९ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आळंदीच्या भाजपाच्या माजी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर तसेच मुलीच्या घारातील व्यक्ती देखील राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने या विवाह सोहळ्याला अनेक राजकारणातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती.

मात्र, गेल्या नऊ महिन्यात नेमके काय कारण घडले की प्रियांका यांनी आत्महत्या केली. मात्र, आता ते कारण समोर आले आहे. लग्नानंतर सासरच्यांकडून छळ, अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. या सगळ्या त्रासाला कंटाळून प्रियांका यांनी आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. यानुसार पोलिसांनी तपास करून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love