ब्रिक ईटीसीतर्फे १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांसाठी हायब्रीड एज्यु-टेक प्लॅटफॉर्म


पुणे- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील तरुणांना त्यांच्या नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी एज्यु-टेक कंपनी ब्रिक ईटीसीने  हायब्रीड प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. ज्याद्वारे तरुण आणि नावीन्याचा शोध असलेल्या तरुणांना अल्प मुदतीचा अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.

नावीन्यता आणि भविष्यातील संधी यावर आधारित ब्रिक ईटीसी हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जो ३० हून अधिक क्रिएटिव्ह कोर्स उपलब्ध करून देतो . ज्यामध्ये विद्यार्थी त्यांना आवडेल ते  कोर्स करू शकतात. ज्यात विविध  क्षेत्रातील तज्ज्ञांकडून शिकवण्यात येणार आहे . हे कोर्स १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत . जे त्यांना विविध क्षेत्रात त्यांची क्षमता शोधण्याची आणि काही कौशल्य मिळविण्याची संधी निर्माण करून देतील.

विद्यार्थ्यांना ज्यात करिअर करायचे आहे त्या विषयाच्या  अभ्यासक्रमांचा अनुभव घेण्याची संधी याआधी कधीच विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती.  हीच गरज लक्षात घेऊन एसएमर्इएफच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संस्थापक संचालक आणि ब्रिक एटीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मिसाळ यांनी या प्लॅटफॉर्मची संकल्पना मांडली आहे.  प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे करिअर निश्चित करण्यापूर्वी विविध कोर्स करून आपण कशात सक्षम आहोत हे निश्चित करणे या प्लॅटफार्मच्या माध्यमातून सोपे होर्इल, या भावनेतून हे प्लॅटफाँर्म सुरू करण्यात आले आहे. 

अधिक वाचा  अखेर संभाजी विडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे आणि कंपनीचा निर्णय

भव्यता आणि कनेक्ट यांचा मिलाप असलेल्या आणि भविष्यातील अविश्वसनीय संधी उपलब्ध करून देत शाश्वत आणि जागरूक जग तयार करण्यात मदत करू शकणाऱ्या जीतो कनेक्ट २०२२ मध्ये हा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला .ब्रिक ईटीसीमध्ये २००० हून अधिक जणांची नोंदणी झाली आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थी आणि पालकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यातील एका आव्हानाचे निराकरण केले तर त्याला अविश्वसनीय प्रतिसाद मिळतो हे या प्लॅटफॉर्मने दाखवून दिले आहे.

याबाबत पूजा मिसाळ यांनी सांगितले की या प्लॅटफार्मला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. एक शिक्षक म्हणून, मी नेहमी सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः: सर्जनशील क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे मार्ग शोधत असते. ब्रिक ईटीसी हे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एका अविश्वसनीय प्रवासाची सुरवात आहे. ब्रिक ईटीसीच्या माध्यमातून मी तरुण मनांशी संवाद साधत त्यांची क्षमता शोधण्यात, त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि त्यांची प्रतिभा वाढवण्यास मदत करण्यास उत्सुक आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love