उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावं -चंद्रकांत पाटलांचा सल्ला

राजकारण
Spread the love

पुणे- महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार? प्रत्येकवेळी केंद्रावर सगळं फाडून मोकळं व्हायचं,  तुमचं काय कर्तृत्व आहे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी  पीपीई किट घालून बाहेर पडावं आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात,” असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

 राज्यात कोरोनाच उद्रेक झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बेडची कमतरता भासत आहे तसेच  रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सीजनचा तुटवडा असल्याने नागरिक हैराण झाले आहे. मात्र, यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.दरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.

पाटील म्हणाले, “सगळं केंद्रावर फाडून मोकळं व्हायचं. रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र. ऑक्सिजन केंद्र. मग तुम्ही काय करता? रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करायला १९ दिवस लागतात, गुजरात सरकारने तो कालावधी ४ दिवसांवर आणला. तशी वेगळी मशिनरी उभी केली. आता २२ तारखेनंतर खूप इंजेक्शन उपलब्ध होतील, कारण अडीच कोटी इंजेक्शन फॅक्टरीमध्ये तयार आहेत. पण, ती १९ दिवसांशिवाय बाहेर काढता येत नाही. गुजरातने नवीन युनिट उभं केलं आणि ते चार दिवसांवर आणलं. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन निर्मितीची केंद्र सुरू झाली. महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार? प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवायचं, तुमचं काय कर्तृत्व आहे? उद्धव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावं आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात,” असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला.

“विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेमध्ये तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं?,” असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *