10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन


पुणे -कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड* यांच्या वतीने 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 07/07/2024 रोजी स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ, पुणे येथील हॉल मध्ये साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे साहेब होते. तसेच आजच्या ह्या सोहळयासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे मार्गदर्शक आणि डायमंड पब्लिकेशन्सचे चेअरमन श्री. दत्तात्रय गंगाराम पाष्टेसाहेब आणि प्रमुख वक्त्या डॉ. नीलम ताटके – एम. फिल. ( पीएचडी – समाजशास्त्र) हे उपस्थित होते. दोघांनीही विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा आणि त्यावर मात कसे करता येईल आणि मुख्यतः *वाटा यशाच्या* बाबतीत आणि त्याची तयारी कशी करायची याबाबत उत्तम मार्गदर्शन केले आणि स्वतःचे काही अनुभव पण विद्यार्थीसमोर मांडले. तसेच संस्थेचे मुख्य समन्वयक श्री कृष्णा रामजी कदम साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते *सन्मानचिन्ह* देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे यांनी उपस्थिताचे आभार मानले आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणुन कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि संपर्क प्रमुख आणि सर्व सभासद यांनी मेहनत घेतली.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा.. - अजित पवार