त्याच ठिकाणी डुक्कर बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-पुण्यातील चऱ्होली भागातील वडमुखवाडी परिसरात ५ फेब्रुवारी २०२२ रोजी डुक्कर बॉम्बचा स्फोट होऊन एका पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा या परिसरात बारा डुक्कर बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चऱ्होली वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटी जवळच्या नानाश्री हॉटेल मागे गाईच्या गोठ्याजवळ ५  फेब्रुवारी २०२२ सुपारी एवढ्या आकाराच्या दोरा गुंडाळलेली वस्तू अर्थात डुक्कर बॉम्ब फोडत असताना बॉम्बचा स्फोट होऊन राधा गोकुळ गवळी (वय वर्षे ५) या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर राजेश महेश गवळी (वय वर्षे ४) आणि आरती गोकुळ गवळी (वय वर्षे ४) हे दोन मुले या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाली होती.  दरम्यान, हे बॉम्ब येथूनच जवळ असलेल्या  झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या दोन तरुणांनी तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.  पोलिसांनी याप्रकरणी या दोघांना अटकही केली होती त्यानंतर नागरिकांच्या मागणी खातर या भागातील झोपड्याही उठविण्यात आल्या होत्या.

शुक्रवारी सकाळी या स्फोटामध्ये मरण पावलेली राधा हिच्या आईला दोन डुक्कर बॉम्ब या परिसरात दिसून आले तिने याबाबत आपल्या पतीला सांगितले.  पतीने ही माहिती पोलिसांना कळवली.  त्यानंतर दिघी पोलिसांनी पुण्यातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करून या परिसरात शोध घेतला असता त्यांना आणखी बारा डुक्कर बॉम्ब सापडले.  हे बॉम्ब फेब्रुवारी महिन्यातील असावेत अशी शक्यता दिघी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *