#Manoj Jarange Patil: मला गोळय़ा घातल्या, तरी आता मी मागे हटणार नाही- मनोज जरांगे पाटील

Even if I am shot, I will not back down
Even if I am shot, I will not back down

Manoj Jarange Patil | Maratha Reservation: मराठा समाजाला(Maratha)आरक्षण(Reservation) मिळवून देण्यासाठी मी बलिदान द्यायलाही तयार आहे. मला गोळय़ा घातल्या, तरी आता मी मागे हटणार नाही, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी मंगळवारी येथे दिला. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री(CM), उपमुख्यमंत्र्यांना(Deputy CM) वेळ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. (Even if I am shot, I will not back down)

जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठय़ांचे वादळ आंतरवाली सराटी(Antarwali Sarati) येथून शनिवारी मुंबईच्या दिशेने निघाले. हे वादळ नगर, रांजणगाव येथून घोंघावत पुणे, लोणावळय़ाकडे सरकले. पावलागणिक शेकडो मराठे या आंदोलनात एकवटू लागले. त्यामुळे या प्रवाहाला महाप्रवाहाचे स्वरुप प्राप्त झाले. कोरेगाव भीमा, खराडीच्या दिशेने मोर्चा पुढे जाऊ लागला, तसा आंदोलकांचा उत्साह दुणावला. हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगव्या टोप्या, उपरणे, कपाळी गंध, जय भवानी जय शिवाजीचा गजर, एक मराठा, लाख मराठासह मराठा आरक्षणाच्या मागणीचा पुकारा…अन् जरांगेंचे नेतृत्व यामुळे मराठा आरक्षण पदयात्रेत ऊर्जा निर्माण झाली. 

अधिक वाचा  अन्यथा आम्ही अमिताभ आणि अक्षयचे चित्रपट बंद पाडू- का म्हणाले नाना पटोले असे?

या वेळी माध्यमांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, अंतिम निर्णय होईपर्यंत व मराठय़ांना आरक्षण मिळेपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. माझा निर्धार पक्का आहे. प्रसंगी बलिदान देण्याची तयारी मी ठेवली आहे. सरकारने माझा बळी घेतला, तरी मी मागे हटणार नाही. मला गोळय़ा घालण्याचा वा मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कदाचित त्यांच्याकडे त्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मात्र, काहीही झाले, तरी कोणत्याही स्थितीत आपण माघार घेणार नाही. हे टोकाचे आंदोलन आहे. करो वा मरो, अशी स्थिती आहे. पण मला मरणाची भीती नाही. जे व्हायचे ते होऊ दे. आरक्षण हेच माझे ध्येय आहे. मायबाप समाजही धावून येत आहे. मला मारण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील एक रस्ताही शिल्लक राहणार नाही. आमच्याविरोधात काहीतरी डाव टाकत असतात. पण मी सामोरा जायला तयार आहे. मला गोळय़ा घातल्या, तरी हे आंदोलन थांबणार नाही. उलट महाराष्ट्रातील सर्व रस्त्यांवर फक्त मराठाच दिसेल, असेही त्यांनी बजावले. 

अधिक वाचा  #Uday Samant: मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारसकर वादात सरकारला खेचू नये - उदय सामंत

पदयात्रेला एवढा प्रतिसाद मिळेल, असे वाटत नव्हते. मुंबईत कोटीच्या घरात लोक येतील, एवढेच गृहीत धरले होते. मात्र, 26 तारखेला मराठे अपेक्षेपेक्षा अधिक ताकद दाखविणार, याची खात्री पटली आहे. पूर्वी कधीच इतका कोणताही समाज जमला नसेल, इतक्या ताकदीने ते एकत्र येतील, याचे दर्शन सध्या घडत आहे, असे सांगून ते म्हणाले, आपल्या मुलाबाळांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक एकवटले आहेत. सरकारला सात महिने वेळ दिला. 54 लाख नोंदी मिळाल्या. मात्र, सरकार प्रमाणपत्र देत नाही. अध्यादेश काढला, तोही चुकीचा. मी समाजाच्या बाजूने आहे. सरकारच्या नाही, असेही त्यांनी सुनावले.

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बिझी 

सरकारने बोलणे बंद केले, तर आम्हीही बंद करू शकतो. आम्ही नेहमीच गोडीची भाषा करू. पण लक्षात ठेवा आम्ही मराठे आहोत. तुम्ही काही ठरवू शकता, तर आम्हीही ठरवू शकतो. मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांना सध्या वेळ नाही. ते गडबडीत आहेत, बिझी आहेत. गोरगरिब मराठय़ांची त्यांना आवश्यकता नाही. ती मोठी माणसे आहेत. ताकदवर नेते आपल्याकडे कशाला लक्ष देतील. त्यांच्या दृष्टीने आम्ही चिल्लर असू शकतो. बहुदा त्यांना दुसऱयांची गरज असावी, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस व अजित पवार यांना त्यांनी लक्ष केले. 

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काहीतरी टोकन रक्कम मदत म्हणून जाहीर करावी -चंद्रकांत पाटील

 तरीही उपोषणाला बसणारच

मुंबईत अजूनही उपोषणाला परवानगी मिळालेली नाही. कायद्याचा सन्मान राखून आपण अर्ज केला. शांततेच्या मार्गाने होणाऱया उपोषणाला परवानगी देत नसाल, तर ते अयोग्य आहे. परवानगी मिळाली नाही, तरी मी उपोषणाला बसणारच. देशात लोकशाही आहे. हे लोकांचे राज्य आहे. आमची मुंबई आहे. त्यामुळे उपोषणापासून आपल्याला कुणी रोखू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love