Ajit Dada should come before the Maratha society once

#Manoj Jarange Patil: अजित दादांनी मराठा समाजासमोर एकदा यावे; दूध का दूध पाणी का पाणी करू : जरांगे पाटील यांचे आव्हान

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री(Deputy CM) अजित पवार(Ajit Pawar) यांनी आम्हाला संयम ठेवण्यास सांगण्यापेक्षा मराठा समाजाला(Maratha community) आरक्षण(Reservation)(Marataha Society) देण्यास उशीर का झाला म्हणून, सरकारला धारेवर धरले पाहिजे. मात्र, ते उलट वागत आहेत. सात महिन्यांत ते एकदाही मराठा समाजाकडे आले नाहीत. मराठा समाजाने अजून किती धीर धरावा तेच कळेनात. यामुळे अजितदादा(Ajitdada) यांनी एकदा मराठा समाजासमोर यावे, नेमकी भूमिका मांडावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करू, असे आव्हान मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी अजित पवार यांना दिले. तसेच मंत्री छगन भुजबळांमुळे (Chagan Bhujbal) दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला.

जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव सोमवारी (दि. 22) दुपारी नगरमार्गे (Ahamednagar) सुप्याकडे (Supe) रवाना झाले. तत्पूर्वी बाराबाभळी(Barababhali) येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसी(OBC) समाज व मराठा समाज हे एकमेकांच्या मदतीला धावून जातात. एकमेकांना बैल, औत आदींसह अनेक गोष्टींची मदत करतात. एकमेकांच्या लग्नात आम्ही वाढायला असतो, असे आमचे प्रेम आहे. परंतु भुजबळ यांच्यामुळे दोन समाजात तेढ झाल्याचे दिसते. गावोगावी, खेडोपाड्यात मात्र आम्हाला ओबीसींचा पाठिंबा आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी संविधानाच्या मार्गाने आरक्षणावर चर्चा करायला यावी, थोडा धीर धरावा असे म्हटले आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले, धीर काय असतो हेच कळेना. त्यांना म्हणा एकदा या तरी. लांबच राहाता नुसते. एकदा या. दूध का दूध, पाणी का पाणी करू. सात महिन्यांत एकदा देखील आले नाही. बाकीचे येऊन दमलेत. तुम्ही येईना. एसटीचे तिकीट लागेना का? एकदा याच. बोलू. समाजाच्या लेकरांसाठी या. समाजाच्या लेकरांचे कल्याण व्हायला लागले आहे. सरकार तुम्ही चुकीचे करायला लागले आहे, हे डायरेक्ट अजितदादांनी बोलले पाहिजे, असे जरांगे म्हणाले. 25 तारखेला राज्यातील सर्व मराठा मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघाणार आहे. मुंबईत मराठा घुसला आणि तिथे त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास तिथे गल्ली-गल्लीत मराठा दिसेल. सरकारने जनतेचे पालकत्व घेतले आहे. जनतेला दैवत मानता तुम्ही जनतेला तुम्ही वेठीस धरत आहे, हे सरकारला शोभते का? आंदोलनाची दखल घेण्याचे आवाहन सरकारला केले.

.मराठानंतर मुस्लिम आरक्षणासाठी लढणार

मदरशातील मुक्कामावर जरांगे पाटील म्हणाले, हिंदू-मुस्लिम एकोपा होणे आवश्यक आहे. हे लोकशाही, संविधानाचे राज्य आहे. दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. ही मराठा समुदायाची मागणी आहे. याला साद देण्यासाठी मुस्लिम समाजाने साथ दिली. यात गैर काहीच नाही. धर्माचा स्वाभिमान असलाच आहे. मुस्लिम समाजाने वेगळा आदर्श उभा केला आहे. मदरशावर भगवा झेंडा यामुळे एकीचे रुप या मैदानावर दिसेल आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटू द्या. मग मुस्लिम आरक्षण कसे मिळत नाही, तेच बघतो. धनगर बांधवांना कसे आरक्षण मिळत नाही ते पण बघतोच, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *