विद्याभ्यास, योगाभ्यास आणि श्रेष्ठता हेच खरे जीवन – स्वामी रामदेव बाबा

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -जगातील सर्व संशोधने हे योगाच्या माध्यमातून झाले आहेत. योगामध्ये सर्व गोष्टी अंर्तमनातून उत्पन्न होतात. जगातील सर्व मोठ्या कार्यांच्या मुळाशी शौर्य, विरता, पराक्रम आणि उत्साह असतो. योग आणि कर्मयोगामध्येच सर्व गोष्टींचा समावेश आहे. यासाठी शिक्षण, विद्याभ्यास, योगाभ्यास आणि श्रेष्ठतेचा अभ्यास हेच खरे जीवन आहे. योगाभ्यास करताना ध्यानामध्ये परामात्मात लीन व्हावे,” असे विचार योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी व्यक्त केले.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि वर्ल्ड पीस डोम यांच्यातर्फे ‘योग आणि शिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत शांती’ या विषयावर विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमआयटी शिक्षण संस्था समूहातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच स्वामी रामदेव बाबा यांनी योगाचे काही प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक आणि प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव हे उपस्थित होते.

स्वामी रामदेव बाबा म्हणाले,“ शिक्षण घेणारे लोक छोटे मोठे कार्य करू शकतात पण जगात ज्यांना सर्वश्रेष्ठ कार्य करावयाचे आहे त्यांना योगामध्येच प्रवेश करावा लागेल. त्यासाठी एकांताचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. योगामुळे शिस्त व प्रेरणादायी विचारांबरोबरच अनेक सकारात्मक गोष्टी आपोआपच अंतर्मनातून  उत्पन्न होतात. देशातील सामाजिक आणि मानसिक समस्या सोडविण्यासाठी मोठ्या स्वरूपात कार्य होण्याचे गरजेचे आहे. आज वैद्यकीय शास्त्र जे करू शकले नाही ते योगाच्या माध्यमातून साध्य होतांना दिसत आहे. यामुळे डायबिटीज सारख्या अनेक असाध्य रोगांना कायमस्वरूपी घालविले आहे. पतांजलीच्या माध्यमातून आरोग्य संदर्भातील शिक्षण देण्यासाठी देशात १ लाख वेल्नेस सेंटर उघडणार आहे. यात सर्वांना जीवन विद्येचे ज्ञान दिले जाईल.”

“ देशाला योग आणि शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देतांना समृध्दी आणता येईल. त्यासाठी पतांजली ने २ हजार एकर जागेत जीवनाला आयाम देणारे विद्यापीठ उभारण्यात येणार असून त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील सर्व शाखांचे शिक्षण, इंजिनियरिंग, व्यावसायिक शिक्षण, मॅनेजमेंट, कायदा, कृषी, राजकारणाच्या शिक्षणाबरोबरच सर्व विद्याशाखांचे शिक्षण दिले जाईल.”

प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मातृ देव भव, पितृ देव भव, आचार्य देव भव ही भारतीय संस्कृती आहे. संपूर्ण जगात स्वामी रामदेव बाबा यांच्या तपस्येने योगा पोहचला आहे. आज शिक्षणामध्ये मन आणि आत्माचे चिंतन होने गरजेचे आहे. पण योगाभ्यासाच्या माध्यातून या गोष्टीचे चिंतन होते. ज्ञान, कर्म आणि भक्ती योग या तिन्हींच्या माध्यमातून ईश्वर दर्शन घडते.”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर आम्ही अधिक भर देतो. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात योगवर्ग सुरू करून विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ बनविले जात आहेे. या संस्थेत प्रत्येक गुरूवारी सर्वांना योगाचे प्रशिक्षण दिले जाते. योग, अध्यात्म आणि ध्यान या गोष्टी विद्यार्थ्यांनमध्ये रूजविणे काळाची गरज आहे. भारतीय संस्कृती, परंपरा संपूर्ण जगात पोहचविण्यासाठी आज पतांजली आणि आमची संस्था हे कार्य करीत आहे.”

प्रा.डॉ. एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केेले.

प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *