Dr. Madhuri Ghate's research paper presented

डॉ. माधुरी घाटे यांचा शोधनिबंध सादर

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे  – क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या रेडिओलॉजी विभागाच्या उपाध्यक्षा यांनी नुकत्यात दक्षिण कोरियामधील सेऊल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला. गर्भाशयातील फायब्रॉईड पेशी व त्यांच्या विविध प्रकारांचे वैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी T2 मॅपिंगचा वापर हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. 

कोरियन सोसायटी ऑफ रेडिओलॉजी तर्फे भरविण्यात आलेल्या कोरियन काँग्रेस ऑफ रेडिओलॉजी २०२३ या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी हा प्रबंध सादर केला. या परिषदेत १४ देशातील साडे तीन हजारांहून अधिक रेडिऑलॉजिस्ट सहभागी झाले होते. भारतातून १६४ हून अधिक रेडिऑलॉजिस्ट त्यात सहभागी झाले होते. 

क्रन्सा डायग्नोस्टिक्सच्या डॉ. माधुरी घाटे यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाचे सर्व उपस्थित डॉक्टर व संघटनेच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले व त्यांचे अभिनंदन केले. अशा या वेगळ्या विषयावरील संशोधनासाठी क्रन्सा डायग्नोस्टिक्सचे चेअरमन राजेंद्र मुथा व व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन यांनी डॉ. माधुरी घाटे यांचे अभिनंदन केले आहे.  

क्रन्सा डायग्नोस्टिकच्या पुणे स्थित अत्याधुनिक `टेली रेडिओलॉजी हब` ला केंद्र शासनाच्या नॅशनल अॅक्रिडिएशनमुळे बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (एनएबीएच) प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. `टेली रेडिओलॉजी हब` ला `एनएबीएच`चे प्रमाणपत्र मिळवणारी `क्रस्ना` ही भारतातील पहिली डायग्नोस्टिक कंपनी आहे.  दररोज देशभरातील विविध केंद्रांमधून केल्या जाणाऱ्या ५ हजार ५०० एमआरआय – सीटीस्कॅन, २५ हजारांहून अधिक एक्स रे करून रोगनिदान चाचण्यांचे गुणवत्तापूर्ण अहवाल वेळेत उपलब्ध करून दिले जातात. यासाठी २५० हून अधिक रेडिऑलॉजिस्ट डॉक्टरांची टीम आहे. या पायाभूत सुविधांसोबत क्रन्सा डायग्नोस्टिक रेडिओलॉजी विभागात अशा संशोधनासाठी पाठिंबा दिला जातो. त्याचा आनंद व समाधान असल्याची प्रतिक्रिया डॉ. माधुरी यांनी व्यक्त केली.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *