डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही संतविचारांचे पाईक : लक्ष्मीकांत खाबिया


नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने 1920 मध्ये सुरू झालेल्या मुकनायक या पाक्षिकात जगत्‌‍गुरू तुकाराम महाराज यांची ‘काय करू आता धरुनिया भीड नि:शंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित’ तर 1927 साली स्वत: सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ‘आता कोंडद घेऊनि हाती आरूढ पांइये रथी देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने, जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानु वाढवी इया भारापासोनि सोडवी मेदिनी हे’ ही ओवी ठळकपणे प्रसिद्ध केली होती. यावरून असे दिसते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर संतविचारांचे पाईक होते, असे प्रतिपादन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर कारागृहात आयोजित स्पर्धेत बंदीजनांनी सहभाग नोंदवत ‘सुंदर वन वृक्षांची दाटी’, ‘शहाणपणे वेद मुखा’, ‘पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला’ आणि स्वरचित ‘काळाने घातला घाव’ ह्या रचना सादर केल्या. त्या वेळी खाबिया यांनी बंदीजनांशी संवाद साधला.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान- चंद्रकांत पाटील

खाबिया पुढे म्हणाले, बाबासाहेब हे संत गाडगे महाराज यांचे कीर्तन ऐकायला जात. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याही ते सान्निध्यात होते. संतांचे विचार ह्या जगाला तारू शकतात, संतांच्या विचाराप्रमाणे जग चालले तर दिनदुबळ्यांची सेवा होऊ शकते असे वाटले असेल म्हणूनच डॉ. बाबासाहेब यांनी संतांच्या ओव्या प्रसिद्ध केल्या असाव्यात. पहिल्या पाक्षिकासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकर यांनी 2500 रुपयांची देणगी दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. डॉ. आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बहुजनांच्या उद्धारासाठी बौद्ध धर्म स्वीकारला, असेही त्यांनी सांगितले.

न्यायाधीश पवार, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, तुरुंग अधिकारी देवराम आडे, तुरुंग अधिकारी वामन मिमजे, प्रशासन अधिकारी दिलीम मोरे, वरिष्ठ लिपिक काळे, कारागृहतील गुरुजी लक्ष्मण साळवे, संजीव आटवादे, नागपूर स्पर्धा प्रमुख विरेंद्र लाटनकर, रोशन खोब्रागडे, प्रतिष्ठशनचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख जगदीश जुनगरी, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजय मिसाळ, शंकर धुमाळ आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेदहा हजारहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी

संतांचे विचार अंगीकारावेत

न्यायाधीश पवार म्हणाले, संतांनी समाजाला कायम चांगले विचार देण्याचे काम केले आहे. संतांनी सांगितलेल्या विचारांचे चिंतन आणि कृती केल्यास सुख मिळते. आयुष्यात सुखी-समाधानी होण्यासाठी बंदीजनांनी संतांचे विचार अंगीकारावेत.

स्पर्धेमुळे बंदीजनांमध्ये उत्साह

कारागृहांतील बंदीजनांच्या हितासाठी कारागृह प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे बंदीजनांमध्ये एक वेगळा उत्साह पहायला मिळत आहे.

—-अनुपकुमार कुमरे, कारागृह अधीक्षक, नागपूर

मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार

स्पर्धेच्या निमित्ताने बंदीजनही बोतले झाले. शंकर तामखाने म्हणाला, बेभान होऊन ज्या चुका केल्या त्या सुधारण्यासाठी या भजन स्पर्धेचा शंभर टक्के उपयोग होईल. सलीम शेख म्हणाला, देवाचे नामस्मरण केल्याने मनाला सुख मिळते. पुढील आयुष्यात सुखानेच जगावे अशी इच्छा आहे. मुरली येवले म्हणाला, येथून बाहेर गेल्यानंतर माझी मलीन झालेली प्रतिमा निश्चित सुधारण्याचा प्रयत्न करीन, असा निश्चय भजन स्पर्धेच्या निमित्ताने करतो. आदित्य पाटील म्हणाला, कारागृहात आलो तेव्हा मानसिक त्रात होता, परंतु भजन स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे मनाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली आहे.

अधिक वाचा  अजित पवार यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी

विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र

महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love