आणि.. डॉ.अमोल कोल्हे हे चक्क आढळराव पाटलांच्या पाया पडले

Dr. Amol Kolhe fell at the feet of Adharao Patil
Dr. Amol Kolhe fell at the feet of Adharao Patil

#Amol Kolhe : Shivajirao Aadhalrao Patil: शिरुर लोकसभा(Shirur Loksabha) मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे शिवजयंतीच्या निमित्ताने गुरुवारी किल्ले शिवनेरीवर(Shivneri)एकमेकांच्या समारोसमोर आले. त्यावेळी अमोल कोल्हे हे चक्क आढळरावांच्या पाया पडले. तर आढळरावांनीही त्यांची पाठ थोपटली. नंतर दोघांनी हस्तांदोलन केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि या मतदारसंघाचे माजी खासदार, शिंदे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून कट्टर राजकीय वैमनस्य आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला शिवेरीवर हा प्रसंग घडला. आढळराव हे शिवरायांच्या जन्मस्थळाला वंदन करून परतत होते. तर, कोल्हे हे त्यासाठी चालले होते. त्यावेळी हा प्रसंग घडला. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या दोघांच्याही समर्थकांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. दरम्यान, शिवजयंतीसाठी गडावर आलेल्या ही भेट पाहिलेल्या एका बाल शिवप्रेमीने तुमची मालिका खूप आवडते, असे कोल्हेंना यावेळी सांगताच त्याला सर्वांनीच हसून दाद दिली.

अधिक वाचा  आता मनसेचे 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक' घोषवाक्य

दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते.

वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे. म्हणून की आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे. लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितलं असे कोल्हे यावेळी म्हणाले.

आढळरावांनी एक जरी वारी दिल्लीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असत. आक्रोश मोर्चाची त्यांची टिंगल त्यांनी केली नसती तर बरं वाटलं असत. धोरणात्मक टीका व्हायला हवी, वैयक्तिक टीका, व्यावसायिक कामाविषयी की टीका करणार नाही, पण धोरणात्मक टीका होणार समोरासमोर बसून चर्चा करु पाच वर्षात मी काय केलं यावर बोलू असे आव्हानही त्यांनी दिले. २०१९ ची निवडणूक मी शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने केली आणि आताही तेच करतोय, माझ्या भूमिकेत कुठं बदल झाला आहे? असा सवाल त्यांनी केला.

अधिक वाचा  जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये होते आहे सुधारणा? काय केले बदल?

या पुढचं आयुष्य माझं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी- आढळराव पाटील

अनेक वर्षापासून तारखेनुसार आणि तिचे नुसार शिवजयंतीला मी शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन माझ्या प्रचाराची सभा प्रचाराची सुरुवात केली आहे, असे शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी म्हणाले.  या पुढचं आयुष्य माझं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतीमालाला बाजारभाव मिळण्यासाठी त्याचप्रमाणे कांद्याला बाजार भाव आणि दुधाला बाजार भाव देण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे असेही त्यांनी नमूद केले.

मी नौटंकी करत नाही, मी शेतकरी कुटुंबातील माणूस असल्याने मला शेतकऱ्यांच्या वेदना माहित आहे. शेतकऱ्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या शेती मनाला बाजार भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे. दीड वर्ष आम्ही मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेतले आहेत मी कोणती नौटंकी केलेली नाही मतदारसंघातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : एकजण ताब्यात

#Dr. Amol Kolhe #Shivajirao Adhalrao Patil #Shivneri #Shirur Loksabha #Mahayuti #Mahavikas Aghadi

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love