मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल- चंद्रकांत पाटील यांच्या या सूचक विधानाने राजकीय चर्चेला उधाण


पुणे–मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देहू येथील एका कार्यक्रमात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील यांच्या विधानाचे नक्की संकेत काय? राज्याच्या राजकारणात भूकंप होणार का? अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

पुणे  जिल्ह्यातील देहू येथील  एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. तेव्हा ते पाटलांना माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं त्यावरून राजकीय चर्चेला उधा आलं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा - छत्रपती संभाजीराजे