कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे रविवारपासून दिवाळी पहाटचे आयोजन


पिंपरी(प्रतिनिधी)–पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असून, दिग्गज गायिका रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. दिवाळी पहाटचे सर्व कार्यक्रम पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दि. २३, २४ व २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत, अशी माहिती आयोजक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली.

दिवाळी पहाटच्या पहिल्या दिवशी (दि. २३) मी होणार सुपरस्टार फेम विनय देशमुख, महागायिका उत्तरा केळकर, सारेगम फेम अश्विनी मिठे यांचे गायन; २४ ऑक्टोबर रोजी गायिका पल्लवी पत्की-ढोले, इंडियन आयडॉल फेम मुनावर अली, संजय हिवराळे यांचे गायन होईल, तर २५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय गायक हिम्मत कुमार पंड्या, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका शीर्षक गीत गायक संदीप उबाळे, प्रसिद्ध गायिका चारुलता, गायिका मंजुश्री देशपांडे यांचे सुमधुर गायन होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक सदानंद गाडगीळ करणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  Ramlala idol made from Krishna stone: कृष्ण शिलेपासून बनविलेल्या रामललाच्या मूर्तीचे ही आहेत खास वैशिष्ठ्ये