ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे अंकलीहून प्रस्थान

Departure of horses Of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony from Ankali
Departure of horses Of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony from Ankali

पुणे(प्रतिनिधि)-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या आणि स्वाराच्या अश्वांनी निर्जला एकादशीच्या मुहुर्तावर अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) प्रस्थान ठेवले. अंकलीहून पायी प्रवास करीत हे अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी २८ जून रोजी आळंदीमध्ये पोहोचतील. आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिरातून २९ जून रोजी पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.

अश्वांच्या प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, युवराज विहानराजे शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माऊली गुळुंजकर, पालखी सोहळ्याचे मानकरी योगेश आरु, योगीराज कुऱ्हाडे, राहुल भोर, सरपंच सत्यवान बवले यांच्यासह वारकरी उपस्थित होते. पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व आणि पालखी सोहण्यात रात्री मुक्कामाचे ठिकाणी तंबू देण्याची परंपरा आहे.

अधिक वाचा  मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेवून पाडू- मनोज जरांगे पाटील

अंकली येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यात अश्वांचे विधिवत पूजन आणि धार्मिक पूजा विधी झाल्यानंतर अश्वांची नगर प्रदक्षिणा झाली. हरिनामाच्या गजरात या अश्वाचे आळंदीकडे प्रस्थान झाले. हे अश्व मिरज (१८ जून), सांगलवाडी (१९ जून), इस्लामपूर पेठनाका (२० जून), वहागाव (२१ जून), भरतगाव (२२ जून), भुईंज (२३ जून), सारोळा (२४ जून), शिंदेवाडी (२५ जून),  पुणे (२६ आणि २७ जून) असा प्रवास करीत २८ जून रोजी आळंदी येथे पोहोचतील, असे महादजी राजे शितोळे सरकार यांनी सांगितले.

अश्वांची परंपरा

माऊलींच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे अश्व चालत असतो तो माऊलींचा अश्व. जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असे दोन अश्व सोहळ्यात असतात. १८३२ मध्ये हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलीचा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीसाठी उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे हे रितीरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात. त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love