gtag('js', new Date());
  • Home
  • पुणे-मुंबई
  • कष्टक-यांपर्यंत तातडीने आर्थिक मदत पोहोचवा- खा.बापट यांची मागणी
Image

कष्टक-यांपर्यंत तातडीने आर्थिक मदत पोहोचवा- खा.बापट यांची मागणी

Spread the love

पुणे-कामगार वर्गाला जाहीर झालेली आर्थिक मदत लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचती करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी कोरोना आढावा बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ही बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांना बापट यांनी जिल्हास्तरावर राज्य शासनाची आर्थिक मदत आल्याचे सांगितले.

 ते म्हणाले की, कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही हा या बैठकीचा अजेंडा होता. पथारीधारक,घरेलू कामगार, रिक्षाचालक, ज्येष्ठ नागरिक व इतरांना राज्य शासनाकडून देण्यात आलेली मदत जिल्हास्तरावर आलेली आहे. तथापि ती अद्याप लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. ही मदत त्यांना लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे.

प्रशासनाने 15 मे पर्यंत लॉक डाउन वाढवल्यामुळे या लाभार्थ्यांची उपासमार होत आहे. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होत आहे. म्हणून ही मदत पोहोच विण्यासाठी प्रशासनाने सामाजिक संघटना एनजीओ व लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी. याकामी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य राहील. अशी भूमिका आम्ही पक्षाच्यावतीने मांडली. मागणी वाढल्याने  लसीकरणाची मोहिम दीर्घकाळ चालवावी लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर दुसरा डोस देण्याबाबत ज्येष्ठांना प्राधान्य द्यावे या मुद्यावर आमचा भर आहे.अधिकाधिक लस मिळविण्यासाठी मी स्वतः दररोज केन्दाकडे पाठपुरावा करीत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही - अजित पवार

Related Posts

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

राज ठाकरे यांचा घणाघात : “जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात” :

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या ‘भैय्यांना’ इथे मराठी शिकवून काय साध्य होणार?, असा सवाल…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

राज्य सरकारच्या नवीन सौर धोरणामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले; ८ लाख रुपयांचा दरमहा फटका आणि स्थलांतराची भीती

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)– राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

आम्ही पुणेकर आणि काफिला फाऊंडेशनतर्फे काश्मीरच्या दुर्गम भागात मानवतावादी मदत मोहीम; शैक्षणिक व वैद्यकीय साहित्याचे वाटप

Spread the love

Spread the love पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘आम्ही पुणेकर’  आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

कष्टक-यांपर्यंत तातडीने आर्थिक मदत पोहोचवा- खा.बापट यांची मागणी

by News24Pune time to read: <1 min
0