महिना आणि मूलांकानुसार तुमचे भविष्य – भाग १

अध्यात्म
Spread the love

जगविख्यात भविष्यवेत्ता किरो यांच्या दृष्टीने तुमची जन्मतारीख तुमचे भाग्य आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या भागात आपण कीरो यांच्या अंकशास्त्राच्या पद्धतीची महिती करून घेतली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अंक शास्त्रात मूलांकांना खूपच महत्व आहे. हे मूलांक आहेत एक ते नऊ पर्यंतचे अंक. कोणत्याही अंकाचे रूपांतर मूलांकात करता येते. त्यासाठी एकम्, दशम्, सहस्र या अंकांची बेरीज करावी. बेरीज नऊ पेक्षा जास्त होत असेल तर एकम्, दशम्, या अंकांची बेरीज करावी उदाहरणार्थ ९ + २ चा मूलांक काढायचा असेल ९ + २ = ११ = १+१=२ म्हणजेच ९२चा मूलांक आहे २. तसेच ६२७५ या संख्येचा मूलांक काढायचा असेल तर ६ + २ + ७ + ५ = २० = २ + ० = २

वरील तत्वानुसार आता आपण जन्मतारखेनुसार भाग्य जाणून घेण्यासाठी आधी त्या महिन्याचे फल जाणून घेऊन मूलांकानुसार त्या तारखेचे फल पाहणार आहोत. या भागात जानेवारी महिना आणि त्या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे मुलांकानुसार भाग्य कसे असेल हे जाणून घ्या…

जानेवारी महिना

जानेवारी महिना मकर राशीत येतो. २१ डिसंबरच्या  सुमारास या राशीचा प्रारंभ होतो. या दिवसापासून सात दिवस धनू राशीबरोबर मकर राशीची राशी संधी असते. मकर राशीचा पूर्ण प्रभाव २८ डिसरोंबर ते २१ जानेवारी पर्यंत असतो नंतर मकर व कुंभ यांचा सात दिवस संधी काल असतो. मकर ही स्थल त्रिकोणाची तिसरी रास आहे. तिचा स्वामी उच्चीचा शनी आहे. या राशीला शनीची रास असेही म्हणतात.

या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींच्या स्वभावात व व्यक्तिमत्त्वात खाली दिलेली वैशिष्टये आढळतात

या व्यक्ती अत्यंत महत्वाकांकषी, स्वभावाने उग्र,  धाडसी असतात, एखादी गोष्ट मनापासून करतात. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी अपार परिश्रम करतात. या व्यक्तीचा प्रत्येक ग्रह शनी हा सावध वृत्ती व विवेक यांचे मुर्तिमत प्रतीक आहे. कोणतीही गोष्ट करताना गंभीर चिंतन व त्या गोष्टीचे परिणाम कोणते होतील याचा विचार केल्याशिवाय या व्यक्ती कोणतेही पाऊल उचलत नाहीत. या व्यक्ती संशयी, शंकाखोर असतात. एखाद्या गोष्टीचा कीस पाडायची त्यांची वृत्ती असते. तसे मनाने हे लोक उदार असतात. नवीन सिद्धांत पटकन स्वीकारत नाहीत, मात्र तर्कसंगत गोष्टी पटकन मान्य करतात. तत्त्वज्ञानी, वैज्ञानिक, गंभीर चिंतन करणारे, तर्कशील, दृढ इच्छाशक्ती असणारे असतात. या व्यक्ती अगदी धर्मनिष्ठ तरी असतात किंवा अगदी त्या विरुद्ध असतात. या व्यक्ती बुद्धिवादी असतात. त्या आपल्या अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या व प्रतिभावंत मित्रांच्या दोषांकडे डोळेझाक करतात. त्यांचे दोष पोटांत घालायला तयार असतात.

या व्यक्तीचे इतरांबद्दल पटकन मत तयार होते. पण स्वत:च्या योजनांविषयी मात्र लवकर निराश होतात. स्वत:च्या अपयशाने खचतात. प्रेम, कर्तव्य सामाजिक अर्थशास्त्र या विषयीचे त्यांचे विचार विचित्र असतात. त्यामुळे लोकांना या व्यक्ती विक्षिप्त, चमाकारिक वाटतात. त्यांचे विचार स्वतंत्र असतात. ते अभिमानी असतात. त्यामुळे कोणत्याही कामात आपण नेतृत्व करावे असे त्यांना वाटते. नाही तर त्या कामात त्यांना कोणताही रस वाटत नाही. त्यांना कोणाचेही बंधन नको असते. कोणताही अंकुश नको असतो. मात्र परंपरा व सत्ता याबद्दल त्यांच्या  मनात आदरभाव असतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन गंभीर असतो. जीवन हे विविध समस्यांनी भरलेले आहे असे त्यांना वाटते. या व्यक्ती लवकर निराश होतात.

सतत काम करणे. परिश्रम करणे हा त्यांचा छंद असतो. पण अती घाई करण्याच्या स्वभावापेक्षा एखादे उद्दिष्ट समोर ठेवून हळूहळू, शांतपणे काम करत राहिल्याने जास्त फायद्याचे ठरेल. स्वतःच्या कष्टाने प्रगती साधण्याची शक्यता. तसा मूळ स्वभाव ओजस्वी पण निराशावादी स्वभाव असल्याने मन प्रसन्न राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक,

बहुधा या व्यक्तीबद्दल गैरसमज आवळतात. ते इतर लोकांमध्ये मिसळत नाहीत. जिवलग मित्र कमी असतात. एकाकी वृत्ती. नगर पालिका, राजकारण, सरकारी नोकरी किंवा जबाबदारीच्या स्थानावर या व्यक्ती असतात.

आरोग्य – शनीच्या प्रभावाने सुडौल बांधा, चांगले कार्यक्षम शरीर, त्याच बरोबर निराशावादी. काळजी घेतली नाही तर पित्त, पित्ताशयाला त्रास, अल्सर, पचनसंस्थेच्या अवयवांना विकार होण्याची, आतड्याला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. आरोग्य चांगले राहावे म्हणून आशावादी राहण्याचा प्रयत्न करावा. थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे वापरावेत, स्वत:ची काळजी घ्यावी अन्यथा दमा, श्वसन संस्थेचे विकार होण्याची शक्यता कोरड्या हवेची ठिकाणे जास्त अनुकूल.

आहाराकडे लक्ष द्यावे. व्यायाम घ्यावा. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित राहील. थंड हवा व दमट हवेचा त्रास. त्यामुळे अशापासून दूर राहावे.वरचेवर हवा-पाणी बदलण्यासाठी जावे. मात्र एकाकी ठिकाणी जाऊ नये. खेड्यात शक्य असेल तर एखाद्या पर्वताच्या पायथ्याजवळ पण उंचावर किंवा टेकडीजवळ घर असावे अशी तीव्र इच्छा आढळते. दमट हवेच्या ठिकाणी राहू नये. कारण या व्यक्तींना संधीवात, पाय दुखणे, सुजणे अशा प्रकारचा त्रास पटकन होतो. टाचा, पाय यांना दुखापत होण्याची शक्यताही जास्त असते.

आर्थिक स्थिती – शनीचा व्यापक प्रभाव असल्याने आर्थिक स्थितीबाबत ते शुभ ठरत नाही. आर्थिक उन्नतीत निदान सुरुवातीच्या काळात तरी अडथळे, विलंब लागतो. उद्योगशील स्वभाव, मनपासून काम करण्याची इच्छा, सावध वृत्ती व कमी खर्च करणे यामुळे धनलाभ होतो मात्र नशिबापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने,  प्रयत्नाने संपत्ती मिळवण्याची शक्यता जास्त. जमीन, घरदार यात पैसे गुंतवणे, कारखाने उभारणे, विशेषतः कोळसा. काच किंवा लोखंडी वस्तू परिवहन किंवा कृषी क्षेत्रात, शेतीला उपयुक्त असणाऱ्या यंत्र सामुग्रीच्या क्षेत्रात उपयोग करणे लाभदायक ठरेल.

स्वत:चेच पैसे मिळविण्यात अडचण येईल म्हणून जामिनाशिवाय कोणालाही पैसे उसने देऊ नका. नाही तर पैसे बुडलेच म्हणून समजा.

विवाह, भागीदारी इत्यादी – तुमची स्वत:ची रास मकर (२१ डिसेंबर ते २० जानेवारी), त्रिकोणाच्या इतर दोन राशी वृषभ (२१ एप्रिल ते २० मे) या राशीच्या शेवटच्या सात दिवसातील संधीकाल आणि मकर राशीपासून सातवी रास कर्क (२१ जून ते २०२७ जुलै) या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्तीचे व तुमचे चांगले संबंध राहतील.

मूलांक १ असणाऱ्या अर्थात १, १०, १९. २८ जानेवारीला जन्मलेल्या व्यक्ती.

रवी, युरेनस आणि उच्चीचा शनी हे तुमचे कारक ग्रह आहेत. रवी आणि युरेनस यांच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात काही वैशिष्टये आढळतील. उदाहरणार्थ, स्वतंत्र विचार, चिंतनशील, गंभीर स्वभाव. स्वतःचे प्रत्येक काम व्यवस्थितपणे करणारे, संतुलित व व्यावहारिक, इतर व्यक्तीच्या विचारानुसार सहजपणे न बदलणारे.

बहुधा यश उशीराच मिळते. मात्र यश निश्चितपणे मिळते. तुमची कोणतीही योजना असो. त्यामागे निश्चितपणे एखादे उद्दिष्ट असतेच. अडचणीमुळे तुम्ही निराश होत नाही. स्वभावाने उदार, महत्त्वाकांक्षी. तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबातील व्यक्ती यांच्यापेक्षा अधिक यश, प्रगतीच्या मार्गावर राहाल. तुमच्या मार्गात अडचणी बऱ्याच येतील. पण धैर्य, चिकाटी यामुळे अडचणी पार कराल.

आर्थिक स्थिती – पैशाच्या बाबतीत तुम्ही कंजूष व सावध वृत्तीने स्वतःचा पैसा निश्चितपणे नफा मिळवून देणाऱ्या व्यापारात किंवा उद्योगात गुंतवाल. कोणत्याही संधीचा अधिकाधिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न कराल. इतर व्यक्तीवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. विशेषतःसामाजिक जीवनात अर्थात काही गोंधळ, बदनामी यालाही तोंड देण्याची वेळ येईल.

आरोग्य – तुमच्या कामाचा उरक दांडगा. अर्थात कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खूप सर्दी -पडसे, संधीवाताचा वास. यापासून दूर राहण्यासाठी  शक्यतो कोरड्या हवेच्या ठिकाणी, समुद्र सपाटीपासून उंचावर असणाऱ्या ठिकाणी राहावे.

तुमचे महत्वाचे अंक आहेत एक (रवी) आणि चार (युरेनस) महत्त्वाची कामे १ व ४ मूलांक असणाऱ्या तारखांना करण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, महिन्याच्या १, ४, १०, १३, १९. २२, २८ व ३१ या तारखा.

रंग – या कालावधीतील व्यक्तींनी सूर्य व युरेनस यांच्या रंगापैकी कोणतेही रंग वापरावेत. रवी – सोनेरी, पिवळा, नारंगी आणि करडा. युरेनस – निळा, (राखाडी) किंवा फिक्के रंग.

भाग्य रत्न – हीरा, नीलमणी, अंबर.  

आयुष्यातील महत्वाची वर्ष – १०.१ २८, ३७, ४६, ५५, ६४, ७३ आणि ४, १३, २२, ३१, ४०, ४९, ५८, ६७, ७६

एक किंवा चार मूलांक असणाऱ्या म्हणजे १.४, १०, १३, १९, २२, २८ आणि ३१ या तारखांना जन्मलेल्या व्यक्तीविषयी तुम्हाला आपुलकी वाटेल.

मूलांक २ अर्थात २, ११, २०, २१ जानेवारीला जन्मलेल्या व्यक्ती

उच्चीचा शनी, चंद्र, नेपच्यून हे तुमचे कारक ग्रह. चंद्र व नेपच्यून यामुळे तुम्ही स्वभावाने उदार व कल्पनाशील. मनाप्रमाणे काम झाले नाही की तुम्ही हताश होता. अती भावनाशील व मनाला लावून घेण्याची वृत्ती.

प्रत्यक्ष व्यावहारिक उपायांपेक्षा कल्पनाशक्तीमुळे यश मिळण्याची शक्यता. तुम्ही उच्च पदांची स्वप्ने पाहाल. आत्मविश्वासाने कार्य केल्यास स्वप्नपूर्ती होऊ शकेल. अती भावनाशील त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहनाची गरज भासते. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही बेचैन व दुःखी व्हाल. तुमची स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी तुम्हाला स्वातंत्र्याची गरज.

आर्थिक स्थिती – तुम्हाला धनाचा मोह वाटत नाही. धन हे उद्दिष्टपूर्तीचे एक साधन आहे असे तुम्ही मानता. आपल्याला पैशाची गरज नाही, आपल्या बुद्धीने हवे ते मिळवू शकू असे तुम्हाला वाटते. तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्यापेक्षा तुम्ही अधिक श्रीमंत आहात असे इतरांना वाटेल. कोणी काही मागितले तर त्यावर नकार देणं तुम्हाला कमीपणाचं वाटतं. स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्ही वाटेल तसा खर्च करता. अर्थात पैशाच्या बाबतीत सावध राहण्याची तुमची जन्मजात वृत्ती असते.

आरोग्य – अती मानसिक श्रमाने तुमचे आरोग्य बिघडते. अशा वेळी थोडी वित्रांती घेतल्यावर बरे वाटेल. विशिष्ट आहारामुळे आपल्याला फायदा होतो असे तुम्हाला वाटतं. संधिवात, डोळ्यांचे विकार, पाठीच्या कण्याला त्रास होण्याची शक्यता असेल तर कोरड्या हवेच्या ठिकाणी राहावे.

तुमच्यासाठी महत्त्वाचे अंक ‘दोन’ (चंद्र) आणि सात ( नेपच्यून) तुम्ही तुमची महत्त्वाची कामे दोन व सात मूलांक असणाऱ्या तारखांना करावीत. आयुष्यातील महत्त्वाची वर्षे याच मूलांकाची असतील. २ व ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तिविषयी तुम्हाला आपुलकी वाटेल.

रंग – स्वत:चा जास्त प्रभाव पडावा, तसेच शुभ व्हावे म्हणून तुम्ही चंद्र व नेपच्यून यांच्या रंगांपैकी कोणता ना कोणता तरी रंग वापरावा. चंद्र पांढरा, क्रीम कलर, फिकट हिरवा. नेपच्यून फिकट गडद कोणतीही छटा असणारा नीळा रंग.

भाग्य रत्न – चंद्रकांत मणी, हरित मणी, लसण्या.

पुढच्या भागात पुढील मूलांकांचे भाग्य कसे आहे ते बघू या….

साभार – तुमची जन्मतारीख तुमचे भाग्य

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *