नामांकित शाळेत नववीतील मुलाला शिक्षिकेने केली बेदम मारहाण : शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

Class IX boy was brutally beaten by the teacher
Class IX boy was brutally beaten by the teacher

पुणे -पुणे शहरातील मध्य भागातील एका नामांकित शाळेत नववीतील मुलाला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली.  याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलाच्या आईने तक्रार दिली आहे. शहराच्या मध्य भागातील एका नामांकित शाळेत ७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा मुलगा नववीत शिकत आहे. दुपारी काही मुले वर्गात गोंधळ घालत होती. त्या वेळी शिक्षिका वर्गात आल्या. मुले बाकावर जाऊन बसली. तक्रारदार महिलेचा मुलगा बाकावर नसल्याचे आढळून आले नाही. त्यानंतर शिक्षिकेने मुलाला फळ्याजवळ नेऊन बेदम मारहाण केली. वर्गातील एका मुलाने मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. चित्रफीत प्रसारित झाल्याचे समजताच मुलाच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे, अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : ‘ब्लड सॅम्पल’मध्ये फेरफार करण्यासाठी वडगाव शेरीतून आले ३ लाख रुपये : दोन डॉक्टरांसहित तिघांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी