Congress is always committed for the welfare of the workers

श्रमिकांच्या हितासाठी काँग्रेस सदैव कटीबध्द : गोपाळदादा तिवारी

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे- ब्रिटीश-गुलामीत पिचत पडलेल्या भारताचे, स्वातंत्र्य लढ्याद्वारे ‘लोकशाहीरुपी देशात रुपांतर’ हे काँग्रेस’नेच् केले व समानता, न्याय व सर्वांगीण प्रगतीची कवाडे देशात उघडली गेली असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असतांनाच् देशातील मोदी सरकारने ऊद्योगपती मित्रांकरीता भांडवलशाही धार्जिण भुमिका घेऊन, कामगार हिताचे २९ कायदे रद्द केले. त्यामुळे कामगार देशोधडीला लागले व असुरक्षीतत्च्या गर्तेत अडकले. देशातील कामगारांप्रती झालेला अन्याय भरुन काढण्यासाठी, २०२४ च्या निवडणुकीनंतर, कामगार हिताचे कायदे पुनर्पस्थापित करून’ कामगार_क्षेत्रास न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भुमिका असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

काँग्रेस प्रणीत इंडीया आघाडीचे पुणे शहर लोकसभेचे ऊमेदवार श्री रविंद्र घंगेकर यांनी आज, १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिना निमित्त, शिवाजी नगर येथील देशातील श्रमिकांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमात काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी बोलत होते.

उपस्थित मान्यवरांनी “महराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या” नागरीकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी, मा. आमदार दीप्तीताई चवधरी, लिगल विभागाचे प्रदेश सचिव ऍड. फैयाज शेख, भाऊ गोरावडे, मयूर काळेल, सतीश चव्हाण, राजेश मांजरे, रमण पवार, धीरज खोरे, रुगवेदी सपकाळ, सुभाष काळे, अविनाश बहिरट, विकास शिरोळे, अरविंद कांबळे, सुरेश नांगरे, शेखर जाधव, अण्णा काळेल इ उपस्थित होते..!

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *