बैलजोडीचा मान आळंदीतील कुऱ्हाडे कुटुंबियांना  

The honor of the bullock pair belongs to the Kuhade family of Alandi
The honor of the bullock pair belongs to the Kuhade family of Alandi

पुणे(प्रतिनिधी)- संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या बैलजोडीचा मान यंदाच्या वषी आळंदीतील कुऱ्हाडे कुटुंबियांना मिळाला आहे. 

याबाबतची बैठक ज्ञानेश्वर महाराज संस्थान कार्यालय, आळंदी येथे गुरुवारी पार पडली. बैठकीला बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱहाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, शिवाजी रानवडे, विलास घुंडरे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर वहिले आदी सदस्य उपस्थित होते. 

पालखी सोहळा रथ बैलजोडीचा मान मिळावा, याकरिता आळंदीतील कुऱ्हाडे कुटुंबियांकडून पाच अर्ज समितीकडे आले होते. त्यानंतर बैठकीत आळंदीतील सहादू बाबुराव कुऱ्हाडे (वस्ताद) यांच्या कुटुंबाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ातील बैलजोडीचा मान? देण्याचा निर्णय एकमताने घेतला गेला. या वेळी देवस्थानतर्फे शाल श्रीफळ देऊन मानकरी सहादू बाबुराव कुऱहाडे (वस्ताद) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामस्थांनी या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. 

अधिक वाचा  पंतप्रधानांच्या ‘डिझाईन इन इंडिया आणि डिझाईन फॉर दी वर्ल्ड’ या भविष्यवेधी संकल्पनेचे डिझाईन समुदायाकडून स्वागत

देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पांडुरंग वरखडे, सागर भोसले, आळंदीकर ग्रामस्थ व देवस्थान कर्मचारी वर्ग उपस्थित होते. माउलींच्या पालखी सोहळय़ाला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुऱहाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहीले, रानवडे कुटुंबालाच मिळतो, आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही, असे बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱहाडे यांनी या वेळी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love