स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती पुढे ढकलावी: का केली विनायक मेटे यांनी ही मागणी?


पुणे- मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होत असून, महिनाअखेपर्यंत यासंदर्भातील चांगला वाईट निर्णय होण्याची शक्यता आहे. आमचा कुठल्याही परीक्षा किंवा  नोकरभरतीला विरोध नाही. परंतु, एक एप्रिलच्या आत या परीक्षा घेतल्या किंवा नोकरभरती केली तर मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यामुळे आघाडी सरकारने स्पर्धा परीक्षा व नोकरभरती पुढे ढकलावी आणि एक एप्रिल नंतर करावी  अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते. यावेळी शिवसंग्रामचे संघटनेचे प्रवक्ते तुषार काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

मेटे म्हणाले, येत्या 8 ते 18 मार्च दरम्यान, मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी आहे. त्यामुळे सरकारने स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती पुढे एक एप्रिलपर्यंत पुढे ढकलावी. आमचा कुठल्याही परीक्षा, नोकरभरतीला विरोध नाही. पण, या परीक्षा एक एप्रिलनंतर घेण्यात याव्यात. एक एप्रिलच्या आत या परीक्षा घेतल्या तर मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होणार आहे. एक एप्रिलनंतर परीक्षा, नोकरभरती करण्यात यावी म्हणून अनेकवेळा सरकारला पत्रव्यवहार केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर अंजली दमानिया यांच्या ट्वीटची चर्चा..

मराठा समाजाच्या मुला-मुलींच्या आयुष्याची राखरांगोळी होऊ नये म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री यांनी पुढाकार घ्यावा. अंतिम सुनावणीकरिता रणनिती ठरविण्यासाठी बैठक बोलवावी. त्यामध्ये 8 ते 18 मार्चदरम्यान होणाऱया सुनावणीसाठी रणनिती ठरविण्यात यावी. अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचीही बैठक बोलविण्यात यावी अशी मागणीही मेटे यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love