ही आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सात लक्षणे


नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—भारतातील कोरोनाचे संकट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसत असतानाच ब्रिटिश कोरोनाने पुन्हा सर्वांना धडकी भरली. ब्रिटिश कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव भारतात होणार नसल्याचा तर कोरोनावरची लस ब्रिटिश कोरोनालाही प्रतिबंध करेल अशी मते तज्ञांनी व्यक्त केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांना दिलेल्या लसीचे डोस परत केले आहेत. त्याला कारण कोरोनाचा नवीन आलेला स्ट्रेन आहे.

ब्रिटिश कोरोना नंतर दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळून आलेल्या नव्या स्ट्रेनची लक्षणे ही कोरोना विषाणूपेक्षा वेगळी आढळून आली आहेत. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (बीएनएचएस) या नव्या स्ट्रेनचे सात लक्षणे सांगितली आहेत.

अंगदुखी,घसादुखी, डोळे दुखणे,डोकेदुखी, जुलाब, त्वचेवर पुरळ उठणे आणि पायांच्या बोटांचा रंग बदलणे ही नव्या स्ट्रेनची लक्षणे असल्याचे बीएनएचएस ने म्हटले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून: कोरोना झाल्याचा बनाव आला अंगलट