इंडियनऑईलकडून प्लॅटिनम फ्लीट ग्राहकांशी संवाद :पर्यावरणास अनुकूल इंधनाच्या वापराला प्रोत्साहन


पुणे- इंडियनऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य आणि संचालक (मार्केटिंग) श्री. व्ही. सतीश कुमार यांनी गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथील प्लॅटिनम फ्लीट ग्राहकांशी नुकताच पुणे येथे संवाद साधला. महामंडळाने फ्लीट ग्राहकांना पर्यावरणास अनुकूल इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच इंडियनऑईलच्या नव्या युगातील उच्च कार्यक्षमतेचे एक्स्ट्राग्रीन या डिझेलचा वापर करण्याचे फायदे समजावून सांगितले. एक्स्ट्राग्रीन हे कार्बन उत्सर्जन कमी करून मायलेज तसेच इंजिनची कार्यक्षमता वाढवते.

इंडियनऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य म्हणाले, “इंडियनऑईलने स्वतःला अशी एक संस्था म्हणून स्थापित केले आहे जिच्यावर तिचे भागधारक विश्वास करू शकतील आणि स्वच्छ व परवडणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यासाठी विसंबून राहू शकतील.” इंडियनऑईल आणि तिच्या वाहतूकदारांच्या ताफ्याने कोविड तसेच जागतिक भू-राजकारणाच्या दरम्यान उत्पादनांचा अखंड पुरवठा सुनिश्चित केला. श्री. वैद्य यांनी नेट झिरोबाबत इंडियनऑईलची कटिबद्धता आणि इंडियनऑईलचे उत्पादन एक्स्ट्राग्रीन वापरण्याचे फायदे समजावून सांगितले.

अधिक वाचा  मुलखावेगळ्या नारीशक्तीच्या कार्याचा जागर: आरोग्यदूत - प्रतिभा आठवले

 फ्लीट वाहतूकदारांना संबोधित करताना व्ही. सतीश कुमार म्हणाले, “ऊर्जेवरील खर्च आणि आर्थिक वाढीचा हे एकमेकांशी जोडलेले आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये वाहतूक क्षेत्राचे मोठे योगदान आहे आणि इंडियनऑईल हा तुमचा मौल्यवान भागीदार आहे.” खरेदी करण्यापूर्वी आणि नंतर अद्वितीय अनुभव देण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा लाभ उठवत आहोत आणि ड्रायव्हर्ससाठी एक्स्ट्राग्रीनसारखे अद्वितीय ब्रँडेड इंधन, आकर्षक लॉयल्टी प्रोग्राम आणि सुविधांसह स्वागत आउटलेट्स सादर केले आहेत,

पेमेंटचा अनुभव सोपा करण्यासाठी आणि फ्लीट व्यवस्थापन कार्यक्षम करण्याच्या हेतूने फ्लीट क्षेत्रासाठी एक्स्ट्रापॉवर हे लॉयल्टी सोल्यूशन इंडियनऑईल प्रदान करते. ड्रायव्हर्ससाठी नियमित आरोग्य आणि डोळ्यांची तपासणी यांसारखे उपक्रम आणि विमा लाभ हे इंडियनऑईलने दिलेले काही लाभ आहेत. सोबतच, पीडित ट्रक कर्मचाऱ्यांच्या मुलांना एकावेळचे शैक्षणिक अनुदान देण्यात येते.  इंडियनऑईलने महामार्गांवर मोठ्या आकारातील आऊटलेट्सवर ‘स्वागत’ या नावाने सुविधा निर्माण केल्या आहेत. तिथे प्रवासातील ड्रायव्हर्सना सेवा पुरवली जाते आणि घरापासून दूर घराचा अनुभव पुरवते. पार्किंगची सुरक्षित जागा, स्वच्छ भोजनालये आणि स्वच्छ वसतिगृहे यासारख्या सुविधांसह ड्रायव्हर्सना उपलब्ध करून देते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love