“जस्ट गम्मत”हे विनोदी नाटक OTT प्लॅटफॉर्म वरती: महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स


पुणे— कोरोनाच्या काळात नाट्यगृहे बंद आहेत गेली 7 महिने नाटक हे बंद आहे. या वर निर्भर असलेले कलाकार हे खऱ्या अर्थाने अडचणीत आलेले असून मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले आहे.पुढील अजून किती काळ लागेल हे ठाऊक नाही तरी देखील कलेची आस असलेल्या कलाकारांनी कोरोनाच्या काळात देखील मदत कार्य करता करता कला सुद्धा जोपासली आहे. अशाच पुण्यातील कलावंतानी कोरोनाच्या काळामध्ये एका विनोदी व्यावसायिक नाटकाची जुळवाजुळव करून नाट्यगृहाची सुरू होण्याची वाट न पाहता OTT प्लॅटफॉर्म वरती ऑनलाईन पद्धतीने नाटक प्रेक्षकांसमोर सादर करायचे हे पक्के ठरवले आहे. महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे.

पुण्यातील ए.स्क्वेर ग्रुप प्रस्तुत “जस्ट गम्मत”हे विनोदी नाटक OTT प्लॅटफॉर्म वरती महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे.येत्या 12 ऑक्टोबरला झूम अप्लिकेशन लाईव्ह परफॉर्म करण्यात येणार असल्याची माहिती नाटकाचे निर्मिती व्यवस्थापक प्रशांत बोगम यांनी दिली.

अधिक वाचा  In pet giá rẻ và in ô dù - Sự kết hợp hoàn hảo cho các sự kiện ngoài trời

 पहिल्याकाळी प्रेक्षक नाट्य गृहापर्यंत येत असे आणि आता “कलाकार,. प्रेक्षकाकडे” जात आहे ही नवीन संकल्पना घेऊन एक निखळ मनोरंजन म्हणून “जस्ट गम्मत”ह्या व्यावसायिक नाटकाची निर्मिती करण्यात आली. कोरोनाचा काळ असून सुद्धा ह्या काळामध्ये काम कलाकारांकडे नव्हते अशातही गेली दीड महिने सरकारने दिलेल्या नियमानुसार तालीमी केल्या आणि या दरम्यान कित्येक तरी संकटाला सामोरे जावे लागले. अशा संकटावर मात करून प्रत्येक कलाकाराने या नाटकासाठी मेहनत घेतली आहे.

   ‘यापुढील काळामध्ये जर नाट्यगृहे सुरूच नाही झाली किंवा काही अटी व शर्तीवर सुरू झाले तर त्याची वाट न पाहता सर्व कलाकार नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांकडे जातील व त्या कलेचा मोबदला म्हणून मानधन स्वरूपामध्ये ( तिकीट) ऑनलाइन तिकीट देतील व त्या बदल्यामध्ये आम्ही नाटक पाहावयास येणाऱ्या प्रेक्षकास ऑनलाईन आयडी व लिंक देणार आहोत.यातुन प्रत्येकास हातभार (मानधन) मिळेल “असे प्रशांत बोगम यांनी सांगितले.

अधिक वाचा  कांदा,लसूनशिवाय लज्जतदार काश्मिरी दम आलू

या नाटकाचे निर्माते दत्ता दळवी, लेखक व दिग्दर्शक प्रताप मालेगावकर असून यातील कलाकार गणेश रणदिवे,योगेश शिरोळे,सायली चव्हाण,तेजस्विनी साळुंके,जगदीश चव्हाण,सागर ससाणे,स्वप्निल मद्वेल,समर कांबळे, नेहा दोरके, अविनाश कीर्ती,आणि प्रशांत बोगम हे कलाकार आहेत व पूर्ण नाटकाची निर्मिती व्यवस्थाची बाजू प्रशांत बोगम यांनी योग्यरित्या

सांभाळली आहे,यावेळी स्वाती हनमघर यांचे सहकार्य लाभले.व महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे आँनलाईन व्यवसायिक नाटक परफॉर्म करणारे कलाकार यांच्या पाठीशी उभे राहणार असे आश्वासन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love