उद्योजक पाषाणकर यांच्या कुटुंबियांची आर्त साद:’जिथे असाल तिथून लवकर घरी या’


पुणे- सुसाइड नोट लिहून ठेवून गेल्या बुधवार पासून बेपत्ता झालेले पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अद्याप कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘तुम्ही जिथेअसाल, तिथून लवकर  घरी या’ अशी आर्त साद त्यांच्या पत्नीने आणि मुलीने घातली आहे.

गौतम पाषाणकर यांची त्यांच्या सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करीत असल्याचे, त्यामध्ये नमूद केले होते. गेल्या बुधवारी गौतम पाषाणकर हे नेहमी प्रमाणे ऑफिसच्या कामा निमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिस मध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर, एका बंद लिफाफा त्यांच्या चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक तो लिफाफा देण्यास घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. बराच वेळ गौतम पाषाणकर आले नसल्याने, पोलिस स्टेशन मध्ये कुटुंबीयांनी तक्रार दिली होती. पाषाणकर यांच्या तपसासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत मात्र, अद्याप त्यांचा कुठलाही ठावठिकाना लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली असली तरी ते वेडवाकडं पाऊल उचलणार नाही, असा त्यांच्या कुटुंबीयांना विश्वास असल्याने,’तुम्ही जिथे आहात, तिथून निघून घरी या’ अशी साद त्यांनी घातली आहे.

अधिक वाचा  बॉक्सिंगपटू मेरी कोम यांनी पुण्यात घेतला लसीचा पहिला डोस

दरम्यान, पोलीसही त्यांचा शोध घेत असून पाषाणकर यांनी हॉटेलमध्ये रूमच बूकिंग केले आहे का? याचाही शोध घेत आहेत. पाषाणकर यांनी यापूर्वी त्यांनी दोनदा ऑनलाईन दोनदा हॉटेलची रूम बुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पाषाणकर यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास त्यांच्या कुटुंबाला 9822474747 या मोबाईल क्रमांकावर किंवा शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या  020-25536263 या क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love