डॉ. श्रीनिवास गुरुराज उडपीकर यांचे दुख:द निधन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- गणित तज्ञ डॉ. श्रीनिवास गुरुराज उडपीकर नुकतेच दुःख:द निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांची व्यस्तता ही गणितातील अभ्यास आणि विविध प्रश्नांवरील उपाय शोधण्यासाठी असायची. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.  

डॉ. उडपीकर यांना गणित या विषयाबद्दल मनापासून प्रचंड आवड होती. जागतिक प्रतिष्ठित गणिततज्ञ  डॉ. श्रीराम अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठाकडून  गणितात डॉक्टरेट घेतली. पुणे येथील सुप्रसिध्द स प.महाविद्यालय येथे त्यांनी 28 वर्ष हून अधिक काळ प्राध्यापक व काहीकाळ गणिताचे विभाग प्रमुख म्हणून काम केले. वयाच्या ८१ व्या वर्षीही ते एक उत्सुक प्रवासी, अन्वेषक आणि खाद्य प्रेमी होते;

जग एक्सप्लोर करण्यासाठी नेहमी भुकेलेला साध्या अभिरुचीचा माणूस, ज्यांना फक्त त्यांचा चहाचा कप, ब्रेड बटर आणि त्याची नोटबुक आवश्यक असावयाचे त्यांची ही व्यस्तता गणितातील अभ्यास आणी विविध प्रश्नांवरील उपाय शोधण्यासाठी असायची.

गणिताच्या क्षेत्रातील नामांकित कारकिर्दीबरोबरच, वडिलांनी स्थापन केलेल्या 96 वर्षाची जुनी संस्था न्यू पुणे बोर्डिंग हाऊस इथे भावंडासह काम करून त्यांनी संस्था मोठी केली

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *