पुणे विद्यापीठामध्ये एसएफआय आणि अभाविपमध्ये राडा : दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते जखमी

Clash between SFI and ABVP workers in Pune University
Clash between SFI and ABVP workers in Pune University

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP ) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. (Clash between SFI and ABVP workers in Pune University)

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापीठात सदस्य नोंदणी सुरू होती. त्यावेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला.या हाणामारीत दोन्ही बाजुचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

अधिक वाचा  हास्याचे फवारे,टाळ्या आणि शिटयांनी रंगले 'हास्यधारा' मराठी कवी संमेलन

एसएफआयच्या गुंडांकडून विद्यार्थ्यांना मारहाण- अभाविपचा आरोप

दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, लोकायत अशा विविध संघटना मिळून विद्यार्थ्यांची दमदाटी करून बळजबरीने सदस्यता करण्यात येत होते, यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर एसएफआय व लोकायतच्या गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न या गुंडांकडून करण्यात आला, असा आरोप अभाविपने केला आहे.

अभाविपच्या गुंडांकडून हल्ला, एसएफआयचा आरोप

आज सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ची सभासद नोंदणी सुरू होती. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या गुंडांनी अचानक येऊन एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप संघटनेचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केला आहे. काहीही कारण नसताना, शांततेत एसएफआयचा सभासद नोंदणी कार्यक्रम सुरु असताना हा हल्ला केला गेला. अचानक एसएफआयच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली असल्याचे रोहिदास जाधव यांनी म्हटले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love