12th exam from 21st February and 10th from 1st March

दहावी- बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर : बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची 1 मार्चपासून

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे— महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इ. १२ वी) बुधवार दि. २१ फेब्रुवारी पासून मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) शुक्रवार दि. १ मार्च २०२४ पासून मंगळवार दि.२६ मार्च २०२४ या कालावधीत पार पडणार आहेत. (The final time table of 10th-12th exams has been announced)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या  ९ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in अधिकृत संकेतस्थळावर आज (दि. २ नोव्हेंबर २०२३) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, इयत्ता बारावीच्या माहिती व सामन्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. २० मार्च ते दि. २३ मार्च २०१४ या कालावधीत पार पडणार आहेत. तसेच इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर इयत्ता १०  वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी,तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार आहेत.

संकेतस्थळावरील वेळापत्रक हे माहितीसाठी देण्यात आले असून याबाबत छापील अंतिम वेळापत्रक सर्व संबंधित शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इतर कोणत्याही संस्था अथवा संकेतस्थळावरीळ वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन देखील शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *