भारतातील टाइप २ मधुमेही प्रौढांसाठी सिटाग्लिप्टीन आणि त्याचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ग्लेनमार्ककडून सादर


पुणे -नावीन्यपूर्णतेवर भर देणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) या जागतिक औषध कंपनीने भारतातील टाइप २  मधुमेही प्रौढांसाठी सिटाग्लिप्टीन आणि त्याचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) सादर केले आहेत. कंपनीने सिटाजीट SITAZIT® या ब्रँड नावाखाली सिटाग्लिप्टीन आधारित औषधांचे ८ वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि त्यांचे प्रकार परवडणाऱ्या किमतीत सादर केले आहेत.

ग्लेनमार्कचे  सिटाजीट आणि त्याचे इतर प्रकार टाइप-२ मधुमेही रूग्णांसाठी सिटाग्लिप्टीन अधिक सुलभतेने मिळण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. डीपीपी४ इनहिबिटर थेरपीमध्ये सिटाग्लिप्टीन हे गोल्ड स्टँडर्ड मोलेक्यूल मानले जाते. यामुळे रुग्ण हे त्यांची ग्लायसेमिक पातळी प्रभावीपणे हाताळू शकतील आणि त्यामुळे अधिक चांगले कॉम्प्लायंस येईल. या औषधांमुळे हायपोग्लाइसेमियाचा धोका कमी असून बीटा सेल संरक्षण मिळते, कार्डिओ-रेनल लाभ मिळतात आणि मूत्रपिंड किंवा यकृताचे विकार असलेल्या रुग्णांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते सुरक्षित आहेत.

अधिक वाचा  मल्टी-स्पेशालिटी आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्टअप फर्स्टक्यूअर हेल्थचा पुण्यात विस्तार

ही औषधे  सिटाजीट   ( SITAZIT®) ,  सिटाजीट   – एम ( SITAZIT®- M ) ,  सिटाजीट   – एम ई आर   ( SITAZIT®- M ER ) आणि  सिटाजीट    – डी ( SITAZIT® D ) या ब्रँड नावाने उपलब्ध असतील. यापैकी प्रत्येक ब्रँडचे दोन वेगवेगळे प्रकार असतील –  सिटाजीट    SITAZIT (सिटाग्लिप्टीन) हे  ५० एमजी आणि १००  एमजी  मध्ये उपलब्ध असेल.  सिटाजीट   – एम SITAZIT® M मध्ये सिटाग्लिप्टीन (५० एमजी ) + मेटफॉर्मिन (५०० एमजी / १००० एमजी ) आणि   सिटाजीट  – एम ई आर SITAZIT® M ER मध्ये सिटाग्लिप्टीन (१०० एमजी ) + मेटफॉर्मिन एसआर  (५०० mg/ १००० mg) असेल.  सिटाजीट    – डी SITAZIT® D हा ब्रँड दोन प्रकारांतील एक नवे कॉम्बिनेशन असून त्यामध्ये   सिटाजीट   – डी SITAZIT® D १००/१० या प्रकारात सिटाग्लिप्टीन (  १००  एमजी ) + डॅपाग्लिफ्लोझिन (१० एमजी ) आणि  सिटाजीट   – डी SITAZIT® D ५०/५ मध्ये सिटाग्लिप्टीन (५० एमजी ) + डॅपाग्लिफ्लोझिन ( ५ एमजी ) असेल.

अधिक वाचा  रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराशिवाय 91 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त

टाइप २ मधुमेहासारख्या जुनाट आजारांमध्ये रुग्णांना मधुमेहाशी लढणारी अनेक दीर्घकाळ औषधे घेणे आवश्यक ठरते. शिवाय, भारतात रुग्णांना औषधाचा खर्च स्वतःच करावा लागतो आणि त्यामुळे उपचार व्यवस्थित होण्यामध्ये औषधाची किंमत हा एक प्रमुख घटक ठरतो. ग्लेनमार्कच्या सिटाग्लिप्टीन आणि त्याच्या एफडीसीची किंमत भारतातील त्याच्या इनोव्हेटर ब्रँडच्या किंमतीच्या एक तृतीयांशने कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love