पुणे – गेली २६ वर्षे गणेशोत्सवात स्व-रूपवर्धिनी संस्था पथनाट्य करत आहे. चळवळ प्रबोधनाची, समाज बदलाची हे ब्रीदवाक्य मनात ठेवून यंदाच्या गणेशोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावर्षी नदी प्रदूषण, संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन या विषयावर पथनाट्य सादर करत आहेत.
विविध वस्ती भागात राहणारी ही मुले वर्धिनीच्या अभ्यासिका व शाखा यात नियमितपणे अभ्यासाला येतात. हीच सर्व मुले गेले एक महिना हा सराव करत होते. संस्थेचे कार्यक्रम प्रमुख शुभम नरके, सुरेश जाधव आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख हरी धायगुडे, मृणाल सुतार, उमेश माळेकर यांनी ही पथनाट्य बसवली आहेत.
👉🏼 नदी प्रदूषण, संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन या विषयावर पथनाट्य
👉🏼 पथनाट्य १० मी मिनिटांचे आहे.
👉🏼 रोज एक गट ४ ठिकाणी सादरीकरण करतो, असे एकूण १० गट
👉🏼 पथनाट्य करण्यापूर्वी प्रत्यक्ष नदीचे प्रदूषण व दूषित नदी सर्व मुलांना दाखवले गेले.
👉🏼 पथनाट्य संपले की सगळे कलाकार नदी संवर्धनासाठी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून जनजागृतीचे पत्रक वाटप करतात.
या पथनाट्याची संहिता लिखाण, ध्वनिमुद्रण संस्थेच्याच कार्यकर्त्यांनी स्वतः केले आहे. लेखक व कवी सुरेश पवार, सुरेश जाधव यांचे यात सहाय्य लाभले.