अरे जाऊ दे.. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत… कोणाला म्हणाले असे अजित पवार?


निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी गुरुवारी ट्विटरवरुन लगावला होता. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीय,’ असा उल्लेख करत निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये केला होता तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही म्हटलं असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचंही म्हटलं होतं.

अधिक वाचा  मराठा सेवा संघाच्या वतीने नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत पत्र

याबाबत अजित पवारयांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, अरे जाऊ दे..  त्यांना फार महत्व द्यायची गरज नाही, कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत Cattle do not die from the crow’s curse असे सांगत अजित पवारांनी निलेश राणेंवर निशाणा साधला.  त्यांचे नाव घेऊन त्यांना मोठं का करू असे अजित पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love