कोरोना काळात वीज कंपनी कडून कामगारांची काळजी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -कोविड काळात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील लाईन हेल्पर, सबस्टेशन ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, या सह विविध रिक्त पदांच्या जागेवर सुमारे 32,000 कामगार कंत्राटी पद्धतीवर फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील जनतेला कोरोना काळात देखील अखंडित व सुरळीत वीज सेवा देत आहेत.

हे काम करत असताना शेकडो कामगारांना कोरोनाची लागण झाली, कोरोना मूळे अनेक कामगार मृत्यूमुखी पडले तर सुमारे 40 कामगारांचा सेवा देत असताना अपघाती मृत्यू झाला.तिन्ही वीज कंपनीतील कामगारांची संख्या ही लाखाच्या घरात आहे. त्या मुळे या काळात कायम कामगारांच्या सोबत लसीकरणा साठी सर्व कंत्राटी कामगारांना कंपन्यांनी प्राधान्य दिले असून लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोना काळात कर्तव्यावर असताना या कामगारांना कोरोना झाल्यास त्यांच्या कोविड तपासणी पासून 14 दिवस गृहविलगीकरण किंवा हॉस्पिटल मध्ये दाखल असलेला गैरहजेरीचा कालावधी हा कर्तव्यावर हजर कालावधी असे ग्राहय धरले जाणार आहे.तसेच हे कामगार कर्तव्यावर असताना कोरोना होऊन दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या वारसास 30 लाख रुपये मिळायची तरतूद वीज कंपन्यांनी केली असून तिन्ही वीज कंपन्यांनी या बाबत आधी ठरवून दिलेल्या काही अटी व शर्ती नुसार विविध परिपत्रके निर्गमित केलेली आहेत.

कोरोना काळात कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळविण्यात मदत व्हावी या करिता कंपनी निहाय ठराविक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याशी संपर्क करावा. सर्व कामगारांनी नियमांचे पालन करत सुरक्षितपणे काम करावे, लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करावी व लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या वतीने  संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *