महाराष्ट्रातील उद्योग संपवणारे बजेट


पुणे- केंद्राने जाहीर केलेल्या बजेट बाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योजकांनी जाहीर निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातील उद्योग संपवणारे बजेट असे या बजेट कडे पाहुन म्हणता  येईल, अशी प्रतिक्रिया  इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर  यांनी व्यक्त केली आहे. 
केंद्र सरकारने 2021 चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्रातील उद्योगांबाबत कोणतेही ठोस तरतूद करण्यात आलेली दिसून येत नाही उलट आसाम तामिळनाडू आणि   बंगाल या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी वातावरण निर्मिती केली आहे असे मत फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी मांडले.

महाराष्ट्रातील उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत महाराष्ट्रात अनेक आजारी उद्योग आहेत परंतु आजारी उद्योगांबाबत कोणतीही भूमिका सरकारने जाहीर न करता आजारी बँकांना मात्र भरघोस तरतूद करण्यात  आली उद्योगांसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा या केंद्राकडून कर्ज घेऊन  स्थानिक राज्यांनी कराव्यात हे म्हणजे परदेशी उद्योगांना रेड कार्पेट आणि  ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज ला 15 टक्के कस्टम ड्युटी वाढवून आणखी संकटात आणले आहे येणाऱ्या आगामी काळातील इलेक्ट्रिकल वाहन उद्योगाबाबत कोणतेही धोरण सरकारने जाहीर केलेले नाही जीएसटी बाबतचा कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय झाला नाही यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारीवर सुद्धा याचा मोठा परिणाम होणार असून बेकारी मध्ये वाढ होईल यापुढे महाराष्ट्रातील उद्योजक गप्प बसणार नाहीत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील उद्योगांकरिता भरघोस तरतूद सुधारित बजेटमध्ये करावी अशी मागणी निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  Moratorium : कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मिळणार दोन वर्षांची सूट?