Hyundai Motor India Limited ची प्राथमिक समभाग विक्री 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू

Hyundai Motor India Limited ची प्राथमिक समभाग विक्री 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू
Hyundai Motor India Limited ची प्राथमिक समभाग विक्री 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू

मुंबई: क्रिसिल अहवालानुसार वर्ष 2023 मधील प्रवासी वाहनांच्या विक्रीवर आधारित जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटो OEM असलेल्या Hyundai Motor Group चा एक भाग Hyundai Motor India Limited (“कंपनी”) मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 रोजी इक्विटी शेअर्सची (“ऑफर”) प्राथमिक समभाग विक्री सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख बीड ऑफरच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 असणार आहे. बोली/ ऑफर गुरुवार, 17 ऑक्टोबर 2024 रोजी बंद होईल.

प्रती इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 1865 रुपये ते 1960 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 7 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 7 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये Hyundai Motor Company च्या (“प्रवर्तक विक्री भागधारक”) 142,194,700  इक्विटी शेअरपर्यंतची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. कंपनीला या ऑफरमधून (”ऑफर प्रोसिड्स”) कोणतेही उत्पन्न प्राप्त होणार नाही.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) 1957 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जाहीर करण्यात आली असून, त्या अंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्त्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

अधिक वाचा  पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला : कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किमतीइतक्या किंवा अधिक किमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्श्यापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी बिगर संस्थात्मक विभागाच्या एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि बिगर संस्थात्मक विभागाच्या दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल.

अधिक वाचा  तर ...पुढचा मुख्यमंत्री मीच असेन : रामदास आठवले

अर्थात, त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या बिगर संस्थात्मक विभागाच्या कोणत्याही उपश्रेणीतील सबस्क्राइब नसलेला भाग दुसऱ्या बिगर संस्थात्मक विभागाच्या इतर उपश्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर लागू असेल. पुढे सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“Retail Category”) उपलब्ध होईल.

त्याचप्रमाणे, कर्मचारी राखीव कोट्यांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर प्राप्त झालेल्या वैध बोलींनुसार, समप्रमाणात इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्श्यात “ASBA” प्रक्रियेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, BSE सह एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”) वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

अधिक वाचा  पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुण्यात वाहतुकीत बदल

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज आणि कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love