दुस-या आणि तिस-या स्तरावरील शहरांत (शॅडो सिटी)व्हर्च्युअल माध्यमातून घरखरेदी साठी वाढती मागणी


पुणे-भारतात घरांसाठीची मागणी आजवर मुख्यतः सर्वात मोठ्या ८ शहरांमध्ये होती, परंतु आता ही मागणी दुस-या आणि तिस-या क्रमांकांच्या शहरांमध्येही (शॅडो सिटी) जोर धरू लागली आहे आणि हा बदल देशभर चाललेल्या लॉकडाऊन च्या काळात अधिक स्पष्ट दिसत आहे असे हौसिंग डॉटकॉम ने म्हटले आहे.   

देशांतर्गत वैश्वीकरण  – छोट्या शहरांत अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची नांदी या विचारपत्रकात  दुस-या आणि तिस-या स्तरावरील शहरांत (शॅडो सिटी) व्हर्च्युअल माध्यमातून घरखरेदी साठी वाढती मागणी येत असल्याचे या ऑनलाइन मंचाच्या प्रवर्तकांनी म्हटले आहे.  अलीकडेच विकसित केलेल्या व्हर्च्युअल मागणी निर्देशांकानुसार, इतकी वर्षे धीम्या गतीने वाढत असलेल्या मागणीत ऑगस्ट २०२० मध्ये एकदम मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. अनलॉक च्या चौथ्या टप्प्यात हा निर्देशांक महानगरांच्या १५० च्या पातळी च्या वर जात शॅडो सिटी साठी २१० वर पोचला आहे.  

अधिक वाचा  कृषीऐवजी कार्पोरेट कंपन्यांनाच सरकारचे ‘प्राधान्य’- अजित नवले

शॅडो सिटीज मध्ये गृहनिर्माणाची गती अगदी कमी होती, मात्र या महामारीच्या रेट्यामुळे पायाभूत रचनेत अनेक बदल घडले आणि शॅडो सिटीज मध्ये घरांच्या मागणीने जोर धरला, असे या  विचारपत्रकात म्हटले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने घेतलेली गती आणि नव्या पिढीचे ग्राहक या शहरांत जमा होण्याची प्रक्रिया यामुळे तेथे फॅशन ब्रँड चे कपडे, महागड्या गाड्या, अलंकार आणि घरे याबद्दल आकर्षण दिसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि रोजगाराबद्दलची अनिश्चितता यामुळे मोठ्या शहराकडून आपल्या गावाकडे असे उलट स्थलांतर सुरु झाले. असे परतलेले कर्मचारी बेरोजगार झाले आहेत किंवा आपल्या कामाच्या जागेपासून दूर राहूनच काम करीत आहेत.   

या उलट स्थलांतरामुळे कामगार वर्ग आपल्या मूळ गावी परतला आणि छोट्या छोट्या गावांमध्ये ऑनलाइन खरेदीत वाढ झाली तसेच ऑनलाइन पद्धतीने मालकीचे किंवा भाड्याचे घर शोधायची सुरुवात झाली, असे पत्रकात म्हटले आहे.  

अधिक वाचा  सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक

आमच्या हाऊसिंग डॉट कॉम   वर गेल्या काही महिन्यात महानगर श्रेणीत नसलेल्या अमृतसर, चंदीगड, वडोदरा, नागपूर, विजयवाडा आणि कोईमतूर या शहरांमध्ये घरांसाठी चौकशी करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे आढळले आहे, असे हाऊसिंगडॉटकॉम, मकान डॉट कॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉम या व्यवसायांचेमुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाल यांनी नमूद केले.  छोट्या शहरांमध्ये मागणी धीम्या गतीने वाढत आहे, मात्र २०२० च्या पहिल्या सहामाहीत ही वाढ २७ टक्के होती. गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ १९ टक्के होती. असेही ते म्हणाले.

आग्रा आणि अमृतसर मध्ये घरांसाठीची व्हर्च्युअल मागणी कोव्हिड च्या काळात दुप्पट झाली तर वडोदरा, मंगळूर, लुधियाना, चंदीगड आणि लखनौ मध्ये ही वाढ ८० टक्के होती. याउलट सर्वात मोठ्या ८ शहरात कोव्हिड कालावधीत मागणीतील वाढ त्याआधीच्या कालावधीच्या मानाने कमी दराने झाली.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love