शरद पवार आणि रोहित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट: भाजयूमोच्या प्रदेश सचिवांना पोलिसांनी घेतले ताब्यात


पुणे-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांचा त्यांच्या पुण्यातील घरातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष असलेले सागर जावळे यांनी तक्रार देऊन मुंबई पोलिसांकडे प्रदीप गावडे यांच्याविरोधात जबाब दाखल केला आहे. मुस्लिम समाज, शरद पवार आणि रोहित पवार यांच्याविरोधात प्रदिप गावडे यांनी ट्विटर हँडलवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबाबत १३ मेला जबाब जावळे यांनी दाखल केला. त्यावरूनच चौकशीसाठी गावडे यांना पुण्यातून मुंबईला नेण्यात आल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, प्रदीप गावडे यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. पुण्याहून त्यांना मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल, असे ट्वीट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  सरळसेवा भरतीसंदर्भात पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय होईल : शरद पवार